breaking-newsपिंपरी / चिंचवड

औद्योगिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या कामगार संघटनांचा गाैरव

पिंपरी|महाईन्यूज|प्रतिनिधी|

चिंचवड येथील पवना सोशल फौंडेशनच्या वतीने भारतीय कामगार चळवळीचे जनक नारायण मेघाजी लोखंडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त शहरातील औद्योगिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या कामगार संघटना आणि कामगारांना रावबहादूर नारायण मेघाजी लोखंडे राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

चिंचवड येथील ऑटो क्लस्टर येथे संपन्न झालेल्या कार्यक्रमाला आमदार महेश लांडगे,नारायण लोखंडे यांचे पणतू गोपीचंद लोखंडे,नागरी सुरक्षा हक्क समितीचे अध्यक्ष मानव कांबळे,राष्ट्रीय श्रमीक आघाडीचे अध्यक्ष यशवंत भोसले,उपमहापौर तुषार हिंगे,नगरसेवक संतोष लोंढे,कांतीलाल भूमकर,नगरसेविका रेखा दर्शले,शिक्षण मंडळाचे माजी सभापती चेतन भुजबळ,माळी महासंघाचे विश्वस्त काळूराम गायकवाड,नामदेव शेलार,आनंदा कुदळे, डॉ राजू जाधव,सुहास गार्डी, विजय दर्शले,हिरामण भुजबळ,विलास जगताप,दत्तात्रय बाळसारफ,दिनकर भुजबळ आदी मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते पुढील संघटना आणि कामगारांना राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. मानपत्र आणि सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप होते.

यामध्ये रावबहादूर नारायण मेघाजी लोखंडे राज्यस्तरीय उत्कृष्ट संघटना पुरस्कार – अंबर चिंचवडे (पिंपरी चिंचवड महापालिका कर्मचारी संघ), काशीनाथ नखाते (कष्टकरी संघर्ष महासंघ), इरफान सय्यद (भारतीय कामगार सेना महासंघ), किशोर वैरागर (महाराष्ट्र राज्य विशेष शिक्षक संघटना), पदमजी पल्स अँड पेपर मिल कामगार संघ, मॅथर अँड प्लॅन्ट एक्सईज युनियन, गरवारे वॉल रोप्स संघटना,
रावबहादूर नारायण मेघाजी लोखंडे राज्यस्तरीय कार्यक्षम अध्यक्ष पुरस्कार – सचिन लांडगे, रावबहादूर नारायण मेघाजी लोखंडे राज्यस्तरीय उत्कृष्ट व्यवस्थापन पुरस्कार – मंगेश शेंडे, रावबहादूर नारायण मेघाजी लोखंडे राज्यस्तरीय सामाजिक पुरस्कार – प्रदीप वाल्हेकर,रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडी, रावबहादूर नारायण मेघाजी लोखंडे राज्यस्तरीय गुणवंत कामगार पुरस्कार – दत्तात्रय विधाटे, शंकरराव घनवट,मच्छीन्द्र भुजबळ यांना देवून गाैरविण्यात आले.

या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अनिल साळुंके, प्रदीप दर्शले, वैजीनाथ माळी, कौस्तुभ जमदाडे, महादेव भुजबळ, किरण पार्टे, उमेश लांडगे, राहुल आल्हाट, अनिकेत ताजने , वैभव गोरगले, रितेश कुदळे निलेश ताजने, सुजित मांडवे, प्रदीप साळुंके, सनी ताजने, गणेश शिंदे आदींनी परिश्रम घेतले. प्रास्ताविक हणमंत माळी यांनी केले. स्वागत फौंडेशनचे अध्यक्ष अमर ताजणे यांनी केले. सुत्रसंचलन अतुल क्षीरसागर यांनी केले तर नवनाथ दर्शले यांनी आभार मानले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button