breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

ओडिशात लोकसभा निवडणुकीत ३३ % महिलांना उमेदवारी देणार

ओडिशाचे मुख्यमंत्री आणि बिजू जनता दलाचे (बीजेडी) अध्यक्ष नवीन पटनाईक यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी मोठी घोषणा केली आहे. एका सभेत ते बोलत होते. आगामी लोकसभा निवडणुकीत त्यांच्या पक्षाच्या वतीने ३३ टक्के महिलांना उमेदवारी देण्यात येईल, अशी घोषणा पटनाईक यांनी केली. विशेष म्हणजे पटनाईक हे पूर्वीपासून संसद आणि विधानसभा निवडणुकीतही महिलांच्या आरक्षणाला समर्थन करत आले आहेत.

पटनाईक हे केंद्रपाडा येथील एका जाहीर सभेत बोलत होत्या. याचदरम्यान त्यांनी तिकिट वाटपात महिलांना ३३ टक्के आरक्षण देण्याची महत्वपूर्ण घोषणा केली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी केंद्रपाडा येथे येऊन मोठा आनंद झाल्याचे सांगितले.

दरम्यान, पटनाईक यांनी यापूर्वी राज्य विधानसभेत संसद आणि विधानसभेत महिलांसाठी ३३ टक्के आरक्षण देण्याचा प्रस्ताव ठेवलेला आहे. दरम्यान, रविवारी सांयकाळी निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीसंबंधी पत्रकार परिषद बोलावली आहे. लोकसभा निवडणुकीबरोबरच ओडिशा विधानसभा निवडणुकीचीही घोषणा होण्याची शक्यता आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button