breaking-newsआंतरराष्टीयताज्या घडामोडी

१५७ प्रवाशांना घेऊन जाणारे विमान कोसळले

इथोपियाची राजधानी अदिस अबाबा येथून केनियातील नैरोबी येथे जात असलेले एक विमान कोसळले आहे. या विमानात ८ क्रू सदस्यासंह १५७ लोक प्रवास करत होते. इथोपियातील पंतप्रधान कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार बोईंग ७३७ विमानाने आपले नियमित उड्डाण केले होते. या अपघातात सर्व प्रवाशांचा मृत्यू झाल्याचे रॉयटर्सने या वृत्तसंस्थेने वृत्त दिले आहे.

इथोपियन एअरलाइन्सने याप्रकरणी एक निवेदन प्रसिद्ध केले आहे. त्यानुसार, बोईंग ७३७-८०० एमएएक्स विमानाने स्थानिक वेळेनुसार सकाळी ८.३० वाजता अदिस अबाबा येथील आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन उड्डाण केले. परंतु, ८.४४ वाजता त्याचा कंट्रोल रुमशी संपर्क तुटला. सध्या सर्च आणि रेसक्यू ऑपरेशन सुरू आहे.

एअरलाइन्सने आपल्या निवेदनात पुढे म्हटले की, आम्ही सर्वतोपरी मदत करत आहोत. इथोपियन एअरलाइन्सने प्रवाशांच्या माहितीसाठी माहिती केंद्र सुरू केले आहे. दरम्यान, विमानकंपनीने आपातकालीन क्रमांक जाहीर केले आहेत. प्रवाशांच्या नातेवाईकांना या क्रमांकावर संपर्क साधून अधिक माहिती मिळवता येईल.

https://twitter.com/ANI/status/1104664294115880960

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button