breaking-newsक्रिडा

ऑस्ट्रेलियाला फॉलोऑन, भारताला विजयाची संधी

सिडनी – भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथ्या आणि अखेरच्या कसोटीतील चौथ्या दिवशी पावसाच्या व्यतयामुळे अवघ्या 24.5 षटकांचाच खेळ होऊ शकला. कालच्या 6 बाद 236 वरून पुढे खेळताना ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 300 धावांवर आटोपला. भारताने ऑस्ट्रेलियाला फॉलोऑन दिला असून दुसऱ्या डावात चौथ्या दिवसअखेर ऑस्ट्रेलियाने बिनबाद 6 धावांची मजल मारली आहे.

कसोटी सामन्याचा उद्याचा दिवस बाकी असून भारताकडे अजूनही 316 धावांची आघाडी आहे. त्यामुळे उद्याच्या दिवशी पावसाचा व्यतय न आल्यास आणि ऑस्ट्रेलियाचे सर्व फलंदाज बाद केल्यास भारताला 3-1 ने मालिका जिंकण्याची नामी संधी आहे.

View image on TwitterView image on TwitterView image on TwitterView image on Twitter

ICC

@ICC

Play on Day 4 has been abandoned due to bad weather and we will have an early start tomorrow. Australia go to stumps on 6/0, trailing by 316 runs.#AUSvIND SCORECARD 👇http://bit.ly/AusvInd7 

भारताकडून पहिल्या डावात कुलदीप यादवने सर्वाधिक 5 गडी बाद केले तर मोहम्मद शमी आणि रविंद्र जडेजाने प्रत्येकी 2 गडी बाद केले.जसप्रीत बुमराहने 1 गडी बाद केला. ऑस्ट्रेलियाकडून मार्कस हॅरिसने सर्वाधिक 79 धावा केल्या. चौथ्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा ऑस्ट्रेलियाच्या बिनबाद 6 धावा झाल्या असून उस्मान ख्वाजा 4 आणि मार्कस हॅरिस 2 धावांवर खेळत आहेत.
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button