breaking-newsआंतरराष्टीयताज्या घडामोडी

ऑस्ट्रेलियातील आगीत २३ बळी, संकटाला तोंड देण्यासाठी ३ हजार सैनिक

मेलबर्न | महाईन्यूज

ऑस्ट्रेलियात जंगलात लागलेल्या आगीने आतापर्यंत २३ जणांचा बळी घेतलेला आहे. या संकटाचा सामना करण्यासाठी ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी शनिवारी ३ हजार रिजर्व्ह सैनिकांना बोलावून घेतलेले आहे. पंतप्रधान मॉरिसन यांनी सांगितले की, आतापर्यंत २३ जणांचा मृत्यू झालेला आहे. कांगारूबेटावरील महामार्गावरील आगीत दोन जणांचा मृत्यू झालेला आहे.

दक्षिण ऑस्ट्रेलियाच्या फ्लिंडर्स चेस नॅशनल पार्क, कांगारू बेट भागात १४ हजार हेक्टर क्षेत्र नष्ट झाले आहे, असे सांगण्यात येत आहे की, या भागात राहत असलेल्या १ लाख लोकांपैकी ७० टक्के लोक येथून निघून गेलेले आहेत. माऊंट होथममध्ये ६७ कि.मी. प्रतितास वेगाने वारे वाहत आहेत. वाऱ्याचा हा वेग ८० कि.मी. प्रतितास होण्याची शक्यता व्यक्त होत आहेत. गिप्सलँडमध्ये तापमान ४० तर पूर्वोत्तरमध्ये ४५ पर्यंत पोहोचण्याची शक्यता व्यक्त होत आहे. व्हिक्टोरियात ८२ हजार हेक्टरवरील क्षेत्र नष्ट झालेले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button