breaking-newsताज्या घडामोडी

ऑनलाईन पीक विमा काढणाऱ्या शेतकऱ्यांची सायबर कॅफेकडून फसवणूक

ऑनलाईन यंत्रणेचा शेतकऱ्यांना फटका बसत असतानाच आता ऑनलाईन पीक विमा काढलेल्या शेतकऱ्यांची सायबर कॅफे चालकाने दिशाभूल करीत फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार यवतमाळच्या आर्णी तालुक्यात उजेडात आला आहे. श्रीगणेशा सायबर कॅफेचा संचालक श्रीकांत काळे असे आरोपीचे नाव असून शेतकऱ्यांच्या तक्रारीनंतर त्याच्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे.

सायबर चालक काळे याने ऑनलाईन प्रधानमंत्री पिक विमा योजनेत बनावट पावत्या देऊन शेतकऱ्यांची फसवणूक केल्याची तक्रार आहे. आर्णी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या या तक्रारींमुळे कृषी व महसूल यंत्रणा देखील हादरली आहे. शेतकऱ्यांना शेती उत्पादनात स्थैर्य प्राप्त करून देता यावे आणि नैसर्गिक आपत्ती व अन्य कारणाने होणाऱ्या नुकसानी पासून बचाव करता यावा यासाठी पिक विमा योजना निर्माण करण्यात आल्या. सदर पिक विमा योजनेत प्रीमियम शेतकऱ्यास भरावा लागतो.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button