breaking-newsमुंबई

कोकणासह गोव्यात मुसळधार पावसाची शक्यता, ऑरेंज अलर्ट जारी

मुंबई – मुंबई – कोकण आणि गोव्यासह मध्य महाराष्ट्र आणि विदर्भ येथे हे येत्या 3 दिवसात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडणार आहे. त्यामुळे हवामान खात्याने संपूर्ण कोकणात आणि गोव्यात ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. या मुसळधार पावसाचाबरोबरच अरबी समुद्रात ताशी 55 किलोमीटर वेगाने वारे वाहणार आहेत. म्हणून मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये, असे आवाहनही हवामान खात्याने केले आहे.

गेले दोन-तीन दिवस पावसाने विश्रांती घेतली होती. मात्र शुक्रवारी सकाळपासून पाऊस पुन्हा बरसू लागला. शुक्रवारी दुपारनंतर पावसाने जोर धरला. 29 ऑगस्ट रोजी गोव्यासह कोकण, मध्य महाराष्ट्र व विदर्भ येथे मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडणार आहे. 30 ऑगस्ट रोजी गोव्यासह कोकणात मुसळधार पाऊस पडणार आहे. आजच्या पावसामुळे 4 ठिकाणी घरांचा भाग कोसळून पडला आहे. तर 4 ठिकाणी झाडांच्या फांद्या तुटून पडल्या आहेत. तसेच 12 ठिकाणी शॉर्ट सर्किटच्या घटना घडल्या आहेत

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button