breaking-newsमनोरंजन

ऐश्वर्या राय बच्चनसह मुलगी आराध्या नानावटी रुग्णालयात भरती

मुंबई : बिग बी अमिताभ बच्चन, अभिनेते अभिषेक यांच्यानंतर आता ऐश्वर्या राय बच्चन आणि त्यांची मुलगी आराध्याला देखील नानावटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या चौघांना ही कोरोना ची लागण झाली होती. मात्र, ऐश्वर्या आणि आराध्याला लक्षणे नसल्याने घरीच होम क्वॉरंटाईन करण्यात आले होते. मात्र, आज ऐश्वर्याला ताप आणि घशात त्रास होऊ लागला तेव्हा त्यांना संध्याकाळी नानावटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मात्र, त्यांची तब्येत स्थिर असल्याची माहिती मिळते आहे.

ऐश्वर्या राय आणि मुलगी आराध्य या दोघींनाही सौम्य लक्षणे असल्याने त्यांना घरीचं क्वॉरंटाईन होण्यास सांगितले होते. मात्र, आता काही उपचारासाठी ऐश्वर्याला रुग्णालयात हलवल्याची माहिती मिळत आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button