breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

मिशन-२०२२ : पिंपरी-चिंचवड भाजपाच्या रणरागिणी मैदानात!

समर्थ बूथ अभियानांतर्गत आढावा बैठकांचा सपाटा

महिला शहराध्यक्ष उज्ज्वला गावडे यांचा पुढाकार

पिंपरी । प्रतिनिधी

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकांसाठी भाजपा महिला मोर्चाच्या रणरागिनी मैदानात उतरल्या आहेत. यामध्ये समर्थ बूथ अभियानांतर्गत बैठका सुरू करण्यात आल्या असून यामध्ये महिलांना मार्गदर्शन केले जात आहे.

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुका येत्या सहा महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. निवडणूक आयोगाने प्राथमिक स्तरावर राबविण्यात येणाऱ्या कार्यक्रमांची  सूचना देखील महानगरपालिकेच्या निवडणूक विभागाल दिली आहे. त्यामुळे एकंदरीत निवडणुकीचे बिगुल वाजले असून, त्या पार्श्वभूमीवर शहरात झाले भाजपा महिला मोर्चाच्या महिला मैदानात उतरल्या. शनिवारी (दि.4) पिंपरी चिंचवड शहर महिला मोर्चा प्रभारी वर्षा डहाळे यांच्या मार्गदर्शनाखाली समर्थ बूथ अभियानासंदर्भात महिला मोर्चाच्या सर्व महिला पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी भाजपा  महिला मोर्चा अध्यक्षा उज्वला गावडे व महिला मोर्चाच्या इतर महिला पदाधिकारी उपस्थित होत्या. या बैठकीत बूथ रचना कशी करायची, संघटन कसे वाढवावे, तळागाळातील लोकांपर्यंत आपले काम कसे पोहचविता येईल व तेथील महिलांना आपल्या समवेत काम करण्याची संधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील राहणे. अशा अनेक मुद्यांवर विस्तृत चर्चा करण्यात आली.

सत्ता खेचून आणण्याची महिलांमध्ये धमक : गावडे

येत्या सहा महिन्यांवर पिंपरी चिंचवड महापालिकांच्या निवडणुका येऊन ठेपल्या आहेत . या निवडणुकांमध्ये नक्कीच महिला मोर्चातील पदाधिकारी जीव ओतून काम करणार आहे. पाच वर्षात भाजपने केलेली विकासात्मक कामे महिला मोर्चाच्या पदाधिकारी घरोघरी नेऊन पोहोचणार आहेत.यामुळे शहर विकास म्हणजे काय हे नक्की शहरवासीयांना समजणार आहे. सत्ता खेचून आणण्याची ताकद महिलांमध्ये आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button