breaking-newsमनोरंजन

‘ए थर्सडे’मध्ये यामी गौतम दिसणार महत्त्वाच्या भूमिकेत

आरएसवीपी’ आणि ‘ब्लू मंकी फिल्म्स’ने केली यामी गौतम अभिनीत डिजिटल चित्रपट ‘ए थर्सडे’ची घोषणा !

बेहज़ाद खंबाटा यांच्याद्वारे लिखित आणि दिग्दर्शित ‘ए थर्सडे’मध्ये यामी गौतम मुख्य भूमिकेत दिसणार आहे. नुकतीच, ‘आरएसवीपी’ आणि ‘ब्लू मंकी फिल्म्स’ यांच्याद्वारे त्यांच्या या आगामी चित्रपटाची घोषणा करण्यात आली. यामध्ये यामी गौतम नैना जैसवाल या एका बुद्धिमान प्ले स्कूल शिक्षिकेची व्यक्तिरेखा साकारणार आहे.

‘ए थर्सडे’ विषयी बोलताना अभिनेत्री यामी गौतम म्हणाली की, ‘ए थर्सडे’ एक अशी दुर्मिळ स्क्रिप्ट आहे कि जिला तुम्ही नकार देऊच शकत नाही. बेहज़ादने कोणत्याही महिला नायिकेसाठी सर्वात मजबूत पात्रापैकी एक लिहिले आहे. माझी व्यक्तिरेखा नैना ही हिंसक आणि प्रेमळ अशा संमिश्र प्रकारची आहे. आरएसवीपी आणि माझ्यामध्ये कामाचे एक चांगले नाते आहे आणि मी त्यांच्यासोबत पुन्हा एकदा काम करण्यास उत्सुक आहे.

आरएसवीपी आणि ब्लू मंकी फिल्म्सद्वारे निर्मित ‘ए थर्सडे’ 2021 मध्ये डिजिटल प्लेटफार्मवर प्रदर्शित होणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button