breaking-newsमहाराष्ट्रमुंबई

शाळाबसमधून अमलीपदार्थांची तस्करी

  • दोन तस्करांना अटक, दीड कोटींचा साठा हस्तगत

गुन्हे शाखेच्या वांद्रे कक्षाने ‘एमडी’ या अत्यंत घातक अमलीपदार्थाच्या दोन बडय़ा तस्करांना अटक करून तब्बल दीड कोटींचा साठा हस्तगत केला. यापैकी एक डोंगरीचा तर दुसरा नालासोपाऱ्याचा आहे. ही दुकली गेल्या दोन वर्षांपासून पालघर परिसरातील कारखान्यात अवैधरीत्या तयार होणारे एमडी शाळाबसमध्ये लादून मुंबईत आणून विकत होती. आतापर्यंत या दोघांनी सुमारे आठ कोटींचे एमडी अशाप्रकारे शहरात आणल्याचे समोर आले आहे.

वांद्रे कक्षाचे प्रभारी निरीक्षक महेश देसाई आणि त्यांच्या पथकाने दीड महिना पाळत ठेवून सलीम खान आणि नुरुलहुदा शेख या दोघांना अटक केली. दोघांकडून तब्बल दहा किलो एमडी हस्तगत केले गेले. गेल्या दोन वर्षांपासून या दोघांनी पालघर परिसरातील एका कारखान्यात अवैधरीत्या तयार होणारे एमडी मुंबईत आणले आणि ते अत्यंत विश्वासातील विक्रेत्यांना विकले. दोन वर्षांपासून सक्रिय असूनही या दोघांच्या कारवायांची कुणकुण परिसरात कोणालाच नव्हती. त्यामुळे त्यांच्या विरोधात एकही गुन्हा नोंद नव्हता, अशी माहिती पोलीस उपायुक्त निसार तांबोळी यांनी दिली.

पालघरहून एमडीची खेप मुंबईत आणताना या दोघांनी शाळाबसचा प्रामुख्याने वापर केला. विद्यार्थ्यांची ने-आण करणाऱ्या शाळाबस सहसा झाडाझडतीसाठी थांबवल्या जात नाहीत. त्यामुळे या दोघांनी शाळाबसच्या चालकांना हाताशी धरल्याचे समजते. उपायुक्त तांबोळी यांनी दिलेल्या माहितीनुसार सलीम आपल्या घरीच एमडीचा साठा दडवून ठेवत होता. विक्रेत्यांपर्यंत माल पोहोचवण्याची जबाबदारी त्याने महिलांवर सोपवली होती.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button