breaking-newsपिंपरी / चिंचवड

एल्गार सेनेची विधानसभानिहाय अध्यक्ष पदाची निवड जाहीर

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

एल्गार सेनेची विधानसभानिहाय अध्यक्ष पदाची निवड जाहीर करण्यात आली. भोसरी विधानसभेसाठी गजानन वाघमोडे, मावळ विधानसभेसाठी राजेंद्र गाडेकर, पिंपरी विधानसभेसाठी लक्ष्मण टकले आणि चिंचवड विधानसभेसाठी अनुराज दुधभाते यांची निवड करण्यात आली आहे. तर, महिला ब्रिगेडच्या अध्यक्षपदी सिमा स्वप्निल शेंडगे यांची निवड करण्यात आली आहे, अशी माहिती संस्थापक राजू दुर्गे यांनी दिली.

धनगर समाजाचे हे संघटन एल्गार सेनेच्या माध्यमातुन महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक गावात, प्रत्येक नगरात समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहचण्याचे नियोजन करणार आहेत. आमच्या कामावर आणि विचारांवर विश्वास असणाऱ्या समाज बांधवांची, युवकांची आणि महिलांची सक्षम टिम या संघटन कार्यातून उभी केली जाणार आहे. महाराष्ट्राच्या प्रत्येक गावात, प्रत्येक तालुक्यात, प्रत्येक जिल्ह्यात एल्गार सेनेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, कार्याध्यक्ष, महिला ब्रिगेड अध्यक्ष आणि युवा ब्रिगेड अध्यक्ष अशा 5 सक्षम कार्यकर्त्यांची वज्रमुठ तयार केली जाणार आहे.

एल्गार सेनेचे प्रत्येक विधानसभेतील पाचजणांची टिम त्या त्या विधानसभा क्षेत्रातील निर्णय प्रक्रिया प्रमुख टीम (कोअर टीम) म्हणुन कार्यरत असणार आहे. या कोअर टीमच्या माध्यमातून त्या त्या विधानसभेत एल्गार सेनेच्या शाखा तयार केल्या जाणार आहेत. 17 ऑक्टोबर 2020 रोजी घटस्थापनेच्या दिवशी दुर्गा देवीचा आशीर्वाद घेऊन, पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या आशीर्वादाने या एल्गार सेनेची अधिकृत घोषणा 17 ऑक्टोबर रोजी दुपारी 12 वाजता फेसबुक लाईव्हद्वारे करण्यात येणार आहे.

धनगर समाजाचे पक्के संघटन या उद्देशाने उदयास येणार असलेल्या महाराष्ट्र एल्गार सेनेचे 17 ऑक्टोबर 2020 पुर्वी किमान 20 विधानसभा अध्यक्षांची अधिकृत घोषणा केली जाईल. उर्वरित विधानसभा अध्यक्ष हे आगामी 3 महिन्यात पुर्ण करुन त्यानंतर जिल्हा कार्यकारिणी आणि सर्वात शेवटी प्रदेश कार्यकारिणी जाहीर करण्यात येईल, दुर्गे यांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button