breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

एम्पायर इस्टेट येथील उड्डाण पुलाच्या रॅम्पचे लोकार्पण; वाहतुक कोडींचा प्रश्न निकाली

पिंपरी|महाईन्यूज|प्रतिनिधी|

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या एम्पायर इस्टेट येथील संत मदर तेरेसा मुख्य उड्डाण पुलावर चढण्यास आणि उड्डाण पुलावरून उतरण्याच्या रॅम्पचा लोकार्पण समारंभ महापौर उषा उर्फ माई ढोरे यांच्या हस्ते आज (शुक्रवारी) पार पडला. यावेळी स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी, सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार, नगरसदस्य शितल शिंदे, शैलेश मोरे, सहशहर अभियंता श्रीकांत सवणे, कार्यकारी अभियंता प्रमोद ओंबासे, उपअभियंता संजय साळी, विजय भोजने, दिपक पाटील, संजय काशिद, बापु गायकवाड, रविंद्र सुर्यवंशी, सुनिल पवार, बाळासाहेब शेटे, सल्लागार मिलिंद कुलकर्णी उपस्थित होते.

या प्रकल्पासाठी एकूण 12.69 लाख रुपये खर्च आला आहे. या रॅम्पमुळे काळेवाडी- देहू आळंदी रस्त्यावरील दोन स्वतंत्र रॅम्पची लांबी प्रत्येकी 410 मीटर, दोन स्वतंत्र रॅम्पची रुंदी प्रत्येकी 5.05 मीटर आहे. पुलावरुन खाली येणारा रॅम्प 105 मीटरचा असून पुलावर जाणारा रॅम्प 90 मीटरचा आहे. या रॅम्पमुळे पिंपरी चिंचवड भागातील वाहतूक सुरळीत होणार असून औंध- रावेत
व पुणे- मुंबई बायपासकडून येणारी वाहतूक निगडी- दापोडी (पुणे- मुंबई) रस्त्याशी
जोडली जाणार आहे.

काळेवाडी, थेरगांव, रहाटणी या भागातील नागरिकांना महानगरपालिकेमध्ये व निगडी- दापोडी (पुणे- मुंबई) रस्त्यावर येण्यासाठी सध्या पिंपरी किंवा चिंचवड भागातून यावे लागते. या नविन रॅम्प्समुळे या भागातील नागरीकांना महानगरपालिकेमध्ये व निगडी- दापोडी (पुणे- मुंबई) रस्त्यावर येण्यासाठी कमी वेळ लागणार असून सुमारे १.५० कि.मी. अंतर कमी होणार आहे.

एम्पायर इस्टेटमधील नागरिकांना काळेवाडी, थेरगांव, रहाटणी या भागात येण्यासाठी सध्या चिंचवडगांव किंवा पिंपरी भागातून यावे/ जावे लागते. नविन रॅम्पमुळे काळेवाडी, औंध, रावेत, हिंजवडीस जाण्यासाठी सोयीचे व कमी अंतराचे मार्ग उपलब्ध झाला आहे.

शहरातील दक्षिण उत्तर वाहतूक सुरळीत झाली असून सदरचे रॅम्प वाहतूकीच्या
दृष्टीने अत्यंत गरजेचे आहेत. नवीन बीआरटीएस कॉरिडॉरमुळे सार्वजनिक वाहतुक
व्यवस्था सक्षम होणेस मदत होणार आहे. या व्यवस्थेत दररोज १ -१.५० लाख प्रवासी
अपेक्षित आहेत. त्यामुळे रॅम्पच्या वाहतूकीमुळे नागरिकांसनिगडी- दापोडी (पुणे- मुंबई)
रस्त्यावरील बीआरटीएस बस स्टॉपची होणारी वाहतूक सुरळीत होणार आहे.
एम.एम.स्कूल चौक, शगुन चौक, पिंपरी चौक व अहिल्यादेवी होळकर चौक
येथील वाहतूक कोंडी कमी होणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button