‘एम्पायर इस्टेट’ उड्डाणपुलाच्या ‘रॅम्प’साठी सल्लागाराची नेमणूक
पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून विकास कामांना सल्लागार नेण्याचा सपाटा सुरूच आहे. चिंचवडच्या एम्पायर इस्टेट येथील मदर तेरेसा उड्डाण पुलावर चिंचवडकडील बाजूस चढणे आणि उतरणेसाठी रॅम्प तयार करण्यात येणार आहे. त्यासाठी महापालिकेने मे. मॅप्स ग्लोबल सिव्हिलटेक प्रा. लि. संस्थेला सल्लागार म्हणून नेमले आहे. त्याच्या खर्चाला स्थायी समितीने आज बैठकीत मान्यता दिली.
पिंपरी-चिंचवड महापालिकेने काळेवाडी ते देहू- आळंदी मार्गावर चिंचवड येथे एम्पायर इस्टेट उड्डाणपूल बांधला आहे. या उड्डाणपुलाचे काम वाढतच चालले आहे. या पुलावरून चिंचवडकडील बाजूस उतरणे व चढणेसाठी रॅम्प तयार करण्यात येणार आहे. या कामाचे स्ट्रक्चरल डिजाईन तपासण्यासाठी मे. मॅप्स ग्लोबल सिव्हिल प्रा. लि. संस्थेला सल्लागार म्हणून नेमण्यास आज स्थायीने मान्यता दिली. हे काम करण्यासाठी निविदा पश्चात एकूण 2.30 टक्के शूल्क अदा करण्यास अध्यक्ष विलास मडिगेरी यांनी मान्यता दिली.