breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

‘एमपीसीबी’कडून चिंचवडची ‘मे.सुपर इंडस्ट्रीज’ सील

महापालिकेच्या स्ट्राॅमवाॅटर ड्रेनेजमध्ये लाल रंगाचे आॅईल सोडल्याने कारवाई

पिंपरी |महाईन्यूज|प्रतिनिधी|

चिंचवड एमआयडीसीतील मे. सुपर इंडस्ट्रीज कंपनीने महापालिकेच्या स्ट्राॅमवाॅटर ड्रेनेजमध्ये लाल रंगाचे फ्रुट अॅड्युजचे आॅईल सोडले होते. त्यामुळे स्थानिक नागरिकांच्या तक्रारीमुळे महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ आणि महापालिका पर्यावरण विभागाच्या अधिका-यांने संयुक्तपणे कंपनीने सोडलेल्या आॅईलची पाहणी तत्काळ पंचनामा करीत कंपनी सील करण्यात आली आहे. दरम्यान, कंपनी व्यवस्थापनास नोटीस बजावून खुलासा सादर करण्याच्या सुचना दिल्या आहेत.

चिंचवडच्या एैश्वरम सोसायटी लगतच्या नाल्यातून दोन दिवस लाल रंगाचे आॅईल मिश्रीत पाणी वाहू लागले होते. त्या पाण्याचा गोड वासही येवू लागला होता. याबाबत नागरिकांनी महापालिका पर्यावरण विभागास एमपीसीबीकडे तक्रार दाखल केली. त्यानूसार दोन्ही विभागाच्या अधिका-यांनी दि.16 जूलैला सदरील नाल्याची पाहणी करत त्या कंपनीचा शोध सुरु केला. तब्बल दोन तास शोध मोहीम राबविल्यानंतर मे. सुपर इंडस्ट्रीज कंपनीचा सुगावा लागला.

चिंचवड एमआयडीसीतील आडवाणी कंपनीशेजारील गट नं. 64 मधील मे. सुपर इंडस्ट्रीज कंपनीने महापालिकेच्या स्ट्राॅमवाॅटर ड्रेनेज लाईनमध्ये लाल रंगाचे फ्रुट अॅड्युजचे आॅईल सोडण्यात आल्याचे निदर्शनास आले. यावर महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ व पर्यावरण विभागाच्या अधिका-यांनी कंपनीची पाहणीत अंदाजे 10 हजार लिटर लाल रंगाचे आॅईल स्ट्राॅमवाॅटर ड्रेनेजमध्ये सोडल्याचे आढळून आले. त्यावर अधिका-यांनी तत्काळ पंचनामा करुन कंपनी सील करत नोटीस बजावून आठ दिवसात खुलासा सादर करण्यास सांगितले आहे. तसेच नाल्यामधून वाहणा-या आॅईलयुक्त पाण्यास आकुर्डी स्टेशन नाल्यावर बांध टाकून प्रतिबंध करण्यात आले. तसेच नदी पात्रात पाणी जावू नये, याविषयी खबरदारी घेण्यात आली. कंपनीने असमाधानकारक खुलासा केल्यास एमपीसीबीकडून फाैजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.

कंपनी कारवाईदरम्यान महापालिका पर्यावरण विभागाचे कार्यकारी अभियंता संजय कुलकर्णी, महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाचे किरण हसबनीस

या कारवाईस महापालिकेचे पर्यावरण कार्यकारी अभियंता संजय कुलकर्णी, एमपीसीबीचे उपप्रादेशिक अधिकारी किरण हसबनीस, उपअभियंता एच.पी.बन्सल, एमपीडब्लू अमोल गोरखे, प्रतिक महाले, सुरेश कदम, जगन्नाथ काटे, बाबासाहेब ढोकळे आदीजण उपस्थित होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button