breaking-newsमहाराष्ट्रमुंबई

एमटीएनएलच्या इमारतीला आग, १०० जण अडकले

वांद्रे येथील महानगर टेलिफोन निगम लिमिटेडच्या (एमटीएनएल) इमारतीला भीषण आग लागली आहे. दरम्यान, अग्निशामन दलाच्या १४ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरु आहेत. या इमारतीत १०० लोक अडकल्याचे सांगण्यात येत आहे. आगीचे कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही.

ANI

@ANI

Mumbai: A level 4 fire has broken out in MTNL Building in Bandra, 14 fire tenders are present at the spot. Fire fighting operations are underway. More details awaited.

View image on TwitterView image on TwitterView image on Twitter
२५ लोक याविषयी बोलत आहेत

अग्निशमन दलाच्या माहितीनुसार, सोमवारी दुपारी ३ वाजून ११ मिनिटांनी या ९ मजली इमारतीच्या तिसऱ्या आणि चौथ्या मजल्यावर आग लागली. लेवल ४ ची आग असल्याचे अग्निशमन कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. इमारतीतून बाहेर पडण्यासाठीचे मार्ग बंद झाल्याने आणि मोठ्या प्रमाणावर धूर झाल्याने इमारतीत १०० लोक अडकून पडले आहेत. यांपैकी १५ जणांना वाचवण्यात यश आले आहे. दरम्यान, टेरेसवर असलेल्या १० ते १२ लोकांपर्यंत अग्निशामनची शिडी पोहोचली असून त्यांनाही सुखरुप बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. दरम्यान, बचाव कार्य सुरु करण्यात आले असून या मोहिमेदरम्यान अग्निशामन दलाकडून नवे रोबोटिक तंत्रज्ञान वापरण्यात येत आहे.

इमारतीत अडकलेल्या काही कर्मचाऱ्यांना सुखरुप बाहेर काढण्यात अग्निशमन दलाला यश आले आहे. या कर्मचाऱ्यांच्या माहितीनुसार, आठव्या नवव्या मजल्यावर अनेक लोक अडकून पडले आहे. तर मोठ्या प्रमाणावर धूर निर्माण झाल्याने त्यापासून वाचण्यासाठी काही जण टेरेसवर गेले आहेत. एसीच्या शॉर्टसर्किटमुळे ही आग लागली असण्याची शक्यताही त्यांनी वर्तवली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button