breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

अभिषेक इंटरनॅशनल स्कूलचा दिलासादायक निर्णय: परीक्षा शुल्क व ट्युशन फी सोडून इतर सर्व शुल्क माफ!

पिंपरी | प्रतिनिधी

अभिषेक इंटरनॅशनल स्कूल मोशी याठिकाणी पालक व संस्थाचालक श्री सुरेश कसबे साहेब तसेच शिवसेनेचे पदाधिकारी श्री निलेश मुटके (उपजिल्हाप्रमुख), सुरज लांडगे (युवा सेना जिल्हा युवा अधिकारी), विभाग प्रमुख विश्वनाथ टेमगिरे यांमध्ये बैठक झाली.

अनेक दिवसांपासून पालक व संस्थाचालक यामध्ये विद्यार्थ्यांच्या फी संदर्भात सुरु असलेला संघर्ष आज शिवसेनेच्या मध्यस्थीने सामोपचाराने मिटला. जगात कोरोना ने थैमान घातले असताना अनेक पालकांना आपल्या विद्यार्थ्यांची फी भरताना अडचण येत होती अनेक पालकांना फी संदर्भात संभ्रम होता, शाळांना संस्था चालवताना खूप अडचणी येत होत्या.

परंतु, अशा काळात विद्यार्थ्यांच्या तसेच पालकांच्या या मागणीला आज अभिषेक इंटरनॅशनल स्कूल यांचे संचालक श्री सुरेश कसबे साहेब यांनी सकारात्मक भूमिका घेऊन शाळेच्या ट्युशन फी व परीक्षा शुल्क सोडून इतर अन्य शुल्क या शैक्षणिक वर्षासाठी माफ करण्याचा मोठा निर्णय घेऊन इतर शाळांना मार्गदर्शक ठरेल असा निर्णय घेतला.

तसेच, सामाजिक बांधिलकी म्हणून फी संदर्भात आर्थिक अडचण जर काही पालकांची असेल तर संस्था त्यांच्या पाठीशी उभी राहील.असेही ही संस्था चालकांनी सांगितले. अभिषेक इंटरनॅशनल स्कूल चे संस्थाचालक श्री सुरेश कसबे साहेब यांचे शिवसेना तसेच पालकांच्या वतीने जाहीर आभार मानण्यात आले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button