breaking-newsपिंपरी / चिंचवड

विधवांना समान हक्क मिळण्यासाठी पं. जवाहरलाल नेहरुंनी काम केले – सचिन साठे

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

विधवांना संपत्तीमध्ये पुरुषांप्रमाणेच समान हक्क मिळावा, यासाठी पंडीत जवाहरलाल नेहरु यांनी काम केले. स्वातंत्र्य संग्रामात सहभागी झाल्यामुळे ब्रिटीशांनी त्यांना अहमदनगर येथील तुरुंगात ठेवले. तेथे त्यांनी ‘डिस्कव्हरी ऑफ इंडिया’ हे पुस्तक लिहिले. या पुस्तकात नेहरूंनी सिंधु सभ्यतेपासुन, भारताचे स्वातंत्र्य, भारतीय संस्कृती, धर्म आणि संघर्षाचे वर्णन केले आहे, अशी माहिती पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष सचिन साठे यांनी दिली.

देशाचे पहिले पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरु यांच्या जयंतीनिमित्त पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा कॉंग्रेसच्या वतीने गुरुवारी (दि. 14) आकुर्डी प्राधिकरणात आयोजित केलेल्या कार्यक्रमात साठे यांच्या हस्ते पंडीत नेहरु यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी माजी महापौर कविचंद भाट, सेवादलाचे राष्ट्रीय सहसचिव संग्राम तावडे, माजी नगरसेवक राजाभाऊ गोलांडे, ज्येष्ठ नेत्या बिंदू तिवारी, भोसरी ब्लॉक अध्यक्ष विष्णुपंत नेवाळे, युवक कॉंग्रेस प्रदेश सरचिटणीस मयुर जयस्वाल, ज्येष्ठ नेते हरिदास नायर, सुदाम ढोरे, सेवादलाचे शहराध्यक्ष मकरध्वज यादव, ज्येष्ठ नागरीक सेलचे उपाध्यक्ष लक्ष्मण रुपनर, दिलीप पांढरकर, हुरबानो शेख, मिना गायकवाड, संदेश बोर्डे, दिपक जाधव, निर्मल तिवारी, हिरामण खवळे, सचिन नेटके, सुनिल राऊत, गौरव चौधरी, भाऊसाहेब मुगूटमल, भास्कर नारकडे आदी उपस्थित होते.

साठे म्हणाले की, भारत देशाला ब्रिटिशांच्या जुलमी राजवटीतून मुक्त करण्यासाठी पंडीत जवाहरलाल नेहरु यांनी ‘भारतीय स्वातंत्र्य लीग’ची स्थापना केली. परदेशात शिक्षण घेत असताना आयर्लंडमध्ये झालेले सिन फेन आंदोलन त्यांनी जवळून पाहिले होते. त्यातूनच त्यांनी प्रेरणा घेऊन ब्रिटिश साम्राज्यापासून भारत मुक्त करण्याचे ध्येय घेऊन स्वातंत्र्य संग्रामात स्वत:ला झोकून दिले. 1920 साली शेतक-यांसाठी त्यांनी प्रथम उत्तर प्रदेशातील प्रतापगड जिल्ह्यात किसान मोर्चाचे आयोजन केले, त्यानंतर असहकार चळवळ आणि मिठाचा सत्याग्रह आंदोलनात त्यांना दोन वेळा तुरुंगात जावे लागले.

भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसचा प्रतिनिधी म्हणून परदेशात अनेक आंतरराष्ट्रीय संमेलनात उपस्थित राहण्याची संधी मिळाली. सायमन कमिशनच्या विरोधात काढण्यात आलेल्या मोर्चाचे नेतृत्व पंडीत जवाहरलाल नेहरु यांनी केले. 29 ऑगस्ट 1928 रोजी त्यांनी सर्वपक्षीय परिषदेत भाग घेतला आणि त्यांचे वडील मोतीलाल नेहरू यांच्या नावाने तयार करण्यात आलेल्या भारतीय घटनात्मक सुधारणेवरील नेहरू अहवालावर स्वाक्षरी करणाऱ्यांपैकी ते एक होते, असे साठे यांनी सांगितले.

स्वागत मयूर जयस्वाल यांनी केले. सुत्रसंचालन गौरव चौधरी यांनी केले. आभार मकरध्वज यादव यांनी मानले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button