breaking-newsताज्या घडामोडीराजकारण

एक ट्रांसजेंडर बनल्या देशातील पहिल्या LGBT पॉलिटिकल सेलच्या प्रमुख

मुंबई | राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष हा एलजीबीटी समुदायासाठी स्वतंत्र सेल सुरू करणारा देशातील पहिला राजकीय पक्ष ठरला आहे. सोमवारी मुंबईत बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे आणि पक्षाध्यक्ष जयंत पाटील यांनी मुंबईच्या ट्रान्सजेंडर प्रिया पाटील यांना या सेलचे अध्यक्ष केले. वर्षभर विरार स्थानकाच्या प्लॅटफॉर्मवर राहणाऱ्या प्रिया पाटील यांनी राजकारणापर्यंतचा आपला प्रवास शेअर केला.

3 जुलै 1987 रोजी मुंबईला लागून वसई-विरार येथे मुलगा म्हणून जन्मलेल्या प्रियाचे बालपण हालाकीत गेले. वयाच्या 9 व्या वर्षी त्यांना समजले की त्या एका सामान्य मुलापेक्षा काही वेगळ्या आहेत. जेव्हा त्या 10 वर्षांच्या होत्या तेव्हा त्यांचे वडील आई आणि त्यांना सोडून निघून गेले.

आर्थिक अडचणींचा सामना करून त्या 13 वर्षांच्या झाल्या. तेव्हा समाज, कुटुंब आणि त्यांची आईसुद्धा त्यांच्याविरुद्ध गेली. त्यांचे मुलींसोबत राहणे कुटुंबीयांना आवडले नाही आणि एक दिवस आईने त्यांना घराबाहेर काढले.

प्रिया पाटील पुढे म्हणाल्या की घर सोडल्यानंतर त्या मुंबईतील विरार रेल्वे स्थानकावर आल्या. सुमारे एक वर्ष इथे राहिल्या. यावेळी, दोन-तीन दिवस जेवणही मिळत नव्हते. लोकांचे उष्टे खाल्ले आणि अनेक वेळा लैगिंक शोषणाचा सामना करावा लागला. एका वर्षे त्यांच्याकडे फक्त एक कपडा होता आणि आंघोळ केल्यावर ते कपडे वाळेपर्यंत त्या विना कपड्यांच्या झाडांमध्ये लपून राहत होत्या.

2002 मध्ये विरार रेल्वे स्टेशनवरच त्यांची भेट ट्रान्सजेंडर कम्युनिटीसंबंधीत काही लोकांसोबत झाली आणि पोट भरण्यासाठी त्यांनी त्याच्यासोबत ट्रेनमध्ये भीक मागायला सुरुवात केली. लोकांच्या घरात बधाई देण्यासाठी जाण्याचे काम प्रिया यांनी सुरू केले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button