breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

चिखलीतील ‘एसटीपी’ प्रकल्प थांबवा, अन्यथा न्यायालयात दाद मागणार

पिंपरी, (महा-ई-न्यूज) – चिखलीत सुरू असलेल्या मैलाशुध्दीकरण प्रकल्पाला (एसटीपी) महापालिकेतील विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी विरोध केला असून हा प्रकल्प निळी आणि लाल पूर रेषेमध्ये येत आहे. हा प्रकल्प त्वरीत रद्द करावा, अन्यथा न्यायालयात दाद मागणार असल्याचा इशारा साने यांनी दिला आहे.

चिखली येथील सोसायट्यांमधील मैलामिश्रीत पाण्यावर सुध्दीकरणाची प्रक्रिया करण्यासाठी महापालिकेकडून याठिकाणी मैलाशुध्दीकरण प्रकल्प उभारला जात आहे. या कामाला स्थानिक नागरिकांचा विरोध होत आहे. विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी देखील हा प्रकल्प अनधिकृतपणे होत असल्याचा ठपका ठेवून या प्रकल्पाला विरोध केला आहे. यासंदर्भात साने यांच्या नेतृत्वाखाली चिखलीतील रिव्हर रेसिडेंन्सी, ऐश्वर्यम, स्वराज, स्पारा, क्रिस्टल सोसायटीमधील नागरिकांच्या शिष्टमंडळाने आयुक्त श्रावण हार्डीकर यांची भेट घेऊन हा प्रकल्प त्वरीत रद्द करण्याची मागणी केली आहे.

हा प्रकल्प निळी आणि लाल पुर रेषेत उभारण्यात येत आहे. शहरातील अनधिकृत बांधकामांवर महापालिकेकडून कारवाई होत असताना पालिका प्रशासनच अनधिकृत प्रकल्प उभारत आहे. त्यामुळे या प्रकल्पाला विरोध केला आहे. आयुक्तांनी तातडीने हा प्रकल्प थांबवावा, अन्यथा आपण न्यायालयात दाद मागणार असल्याचे साने यांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button