breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

एक आजोबा आपल्या नातवाची लायकी जाहीररीत्या काढू शकतात हे पहिल्यांदाच पाहिलं – माजी खासदार निलेश राणे

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रसारमाध्यमांसमोर नातू आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्यावर टीका केली आहे. यावेळी “माझ्या नातवाच्या बोलण्याला आम्ही कवडीचीही किंमत देत नाही”, असं शरद पवार म्हणालेले होते. त्यावरुन आता माजी खासदार निलेश राणे यांनी शरद पवारांवर निशाणा साधलेला आहे.

“स्वतःच्या नातवाला ज्या भाषेत पवार साहेबांनी फटकारले वाचून व ऐकून धक्का बसला”, असं ट्विट निलेश राणे यांनी केलेलं आहे. तसेच, “एक आजोबा आपल्या नातवाची लायकी जाहीररीत्या काढू शकतात हे पहिल्यांदाच बघितले”, असंही ते म्हणालेले आहेत.

शिवाय, “पवार साहेब हे जाहीर करा हा राग पार्थ ने राम मंदिरला समर्थन दिलं म्हणून होता की सुशांत प्रकरणात CBI चौकशीची मागणी केली म्हणून?”, असा प्रश्नही निलेश राणेंनी उपस्थित केलेला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button