breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपुणे

अक्षयतृतीयेच्या मंगलदिनी दगडूशेठ गणपतीला ११ हजार आंब्यांचा महानैवेद्य अर्पण

पिंपरी : आज अक्षय तृतीया, साडेतीन मुहुर्तांपैकी एक असलेला आजचा दिवस खूप शुभ आणि मंगल समजला जातो. अक्षयतृतीयेच्या या मंगलदिनी  प्रसिद्ध दगडूशेठ गणपतीला ११ हजार आंब्यांचा महानैवेद्य दाखवण्यात आला. सर्वांचे आराध्य दैवत असलेल्या , लाडक्या गणरायाभोवती आंब्याची आकर्षक आरास करण्यात आली आहे. एवढंच नव्हे तर मंदिरावर फुलांनी आंब्याची प्रतिकृती देखील साकरण्यात आला. तसेच प्रवेशद्वारापासून ते गाभाऱ्यापर्यंतगी रंगीबेरंगी फुलांनी डोळ्यांना सुखावाणारी सजावट तरकण्यात आली. अशा या मंगलमय वातावरणात स्वराभिषेकातून अक्षयतृतीयेच्या निमित्ताने गणराया चरणी गायिका मनीषा निश्चल आणि सहकार्यांनी गायन सेवा अर्पण केली. पहाटे ब्राह्मणस्पती सुप्त अभिषेक करण्यात आला.

हेही वाचा – भोसरीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ‘विजयी संकल्प’ सभा

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट व सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे मंदिरात आंबा महोत्सव आयोजिण्यात आला. त्यानंतर आंब्याचा हा प्रसाद ससूनमधील रुग्ण, वृद्धाश्रम, अनाथाश्रम येथील मुले तसेच गणेशभक्तांना देण्यात येणार आहे. मंदिरात केलेली ही आंब्याची आरास पाहण्यासाठी तसेच गणरायाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी पहाटेपासूनच मोठी गर्दी केली होती.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button