breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल यांच्या मुंबईतील घरावर ईडीचा छापा…

मुंबई | महाईन्यूज |

सक्तवसुली संचलनालयानं म्हणजे ईडीनं रात्री उशिरा जेट एअरवेजचे संस्थापक आणि माजी मुख्य कार्यकारी अधिकारी नरेश गोयल यांच्या मुंबईतील घरावर छापा टाकला. एका ट्रॅव्हल कंपनीद्वारे दाखल करण्यात आलेल्या प्राथमिक माहिती अहवालाच्या आधारे हा छापा टाकण्यात आला. संबंधिक कंपनीनं गोयल आणि त्यांच्या पत्नी अनिता गोयल यांच्यावर ४६ कोटी रूपयांची फसवणूक केल्याचा आरोप केला आहे. याव्यतिरिक्त परकीय चलन विनिमय कायद्याच्या उल्लंघनाशी संबंधित प्रकरणांतर्गत त्यांचा जबाबही नोंदवला आहे.

यापूर्वी गोयल यांच्या मुंबई आणि दिल्लीमधील एकूण १२ ठिकाणी हे छापे टाकण्यात आले होते. परकीय चलन विनिमय कायद्याच्या उल्लंघनाशी संबंधित प्रकरणांतर्गत हे छापे टाकण्यात आले होते. २०१४ मध्ये कऱण्यात आलेल्या या गुंतणुकीदरम्यान एफडीआयच्या नियमांचं उल्लंघन करण्यात आल्याचं तपास यंत्रणांकडून सांगण्यात आलं होतं.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button