breaking-newsटेक -तंत्र

एकाच नंबरवरून अनेक डिव्हाइसमध्ये व्हॉट्सअॅप वापरणं शक्य; युजर्ससाठी नवं फिचर

नवी दिल्ली : इंस्टंट मॅसेजिंग अॅप व्हॉट्सअॅप आपल्या युजर्ससाठी वेळोवेळी नवनवीन फिचर्स घेऊन येत असतं. आता व्हॉट्सअॅप आपल्या युजर्ससाठी असचं एक नवं फिचर लवकरच लॉन्च करणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून कंपनी एका मल्टी डिवाइस सपॉर्ट फीचरवर काम करत होती. हे फिचर लवकरच युजर्सला वापरता येणार आहे. या फिचरचा वापर करून युजर्स एकाच नंबरचा वापर करून फोनमध्ये व्हॉट्सअॅप सुरु ठेवू शकणार आहेत.

WhatsApp च्या नव्या अपडेट्स आणि लेटेस्ट फिचर्सवर नजर ठेवणारी साइट WABetaInfo ने देखील व्हॉट्सअॅपच्या नव्या फिचरसंदर्भात माहिती दिली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, व्हॉट्सअॅपमध्ये लिंक्ड डिवाइसेज नावाचं वेगळं सेक्शन देण्यात येणार आहे. ज्यामार्फत कोणत्या डिवाइसमध्ये एकाच नंबर वरून अकाउंट सुरु आहे, याची माहिती मिळणार आहे. हे सेक्शन युजर्सना व्हॉट्सअॅप मेन्यूमध्ये देण्यात येणार आहे.

लिंक्ड डिवाइसची माहिती मिळणार

व्हॉट्सअॅपच्या या सेक्शनमध्ये युजर्सना आधीपासून लिंक करण्यात आलेले डिव्हाइसही दिसणार आहेत. तसेच त्या डिव्हाइसवर व्हॉट्सअॅप लास्ट टाइम कधी अॅक्टिव्ह होतं, ते देखील समजणार आहे. तसेच याव्यतिरिक्त व्हॉट्सअॅप अॅडव्हान्स सर्च मोड देखील लवकरच घेऊन येणार आहे.

Wi Fi शी करावं लागणार सिंक

व्हॉट्सअॅपचं हे फिचर अॅपच्या अॅन्ड्रॉइड बीटा वर्जन 2.20.196.8 मध्ये दिसून आलं आहे. अॅपचे नवे फिचर्स सध्या अंडर डेव्हलपमेंट आहेत. त्यामुळे बीटा युजर्ससाठी सध्या हे वापरण्यात आलेले नाहीत. मीडिया रिपोर्टनुसार, व्हॉट्सअॅप वेगवेगळ्या डिव्हाइसमध्ये सुरु राहण्यासाठी Wi-Fi Sync ची गरज पडू शकते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button