breaking-newsराष्ट्रिय

तुमचा ट्विटरचा पासवर्ड लगेच बदला

नवी दिल्ली : ट्विटर या सोशल नेटवर्किंग वेबसाइटने आपल्या सगळ्या युजर्सना पासवर्ड बदलण्याचे आवाहन केले आहे. स्टोअर्ड पासवर्डच्या इंटरनल लॉगमध्ये बग आढळल्याने ट्विटरने हे प्रसिद्धी पत्रक जारी केले आहे. आत्तापर्यंत एकाही ट्विटर अकाऊंटचा मिस युज झाल्याची तक्रार आमच्याकडे आलेली नाही. मात्र खबरदारीचा उपाय म्हणून सगळ्या युजर्सला ट्विटरने पासवर्ड बदलण्याची विनंती केली आहे.

मोबाइल, लॅपटॉप किंवा कोणत्याही गॅजेटवर तुम्ही ट्विटर अकाऊंट वापरत असाल तर तिथला तुमचा पासवर्ड तुम्ही त्वरित बदलावा असे ट्विटरने म्हटले आहे. या स्वरूपाचा बग पुन्हा येऊ नये यासाठी आम्ही आवश्यक ती खबरदारी घेतो आहोत असेही ट्विटरने आपल्या अधिकृत प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button