breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

एकनाथ खडसे यांच्यावर होणार ईडीची कारवाई?

मुंबई – भाजपला रामराम ठोकून राष्ट्रवादीत गेलेल्या एकनाथ खडसे यांना सक्तवसुली संचलनालयाकडून (ईडी) नोटीस पाठवली जाणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. पुण्यातील भोसरी जमीन व्यवहाराप्रकरणी ही नोटीस पाठवली जाणार असल्याचं सांगितलं जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि एकनाथ खडसे यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. ईडीला एकनाथ खडसेंविरोधात कोणते पुरावे मिळाले आहेत याविषयी तर्कवितर्कांना उधाण आलं आहे.

वाचा :-राज्यात गेल्या २४ तासांत ३ हजार ४३१ नव्या कोरोना रुग्णांची नोंद

दरम्यान एकनाथ खडसे यांनी यासंबंधी माहिती देताना अद्याप आपल्याला कोणतीही नोटीस मिळाली नसल्याचं म्हटलं आहे. मात्र यावेळी त्यांनी आपल्याला नोटीस येणार असल्याची माहिती मिळाली असल्याचंही सांगितलं आहे. पुण्यातील भोसरी जमीन व्यवहाराप्रकरणी ही नोटीस पाठवली जाणार आहे.

दरम्यान एनसीपीने एकनाथ खडसेंना विधानपरिषद सदस्या होण्यापासून रोखण्यासाठी ईडीची कारवाई केली जात असल्याचा आरोप केला आहे. ईडीच्या चौकशीमुळे त्यांच्या प्रतिमेवर परिणाम होण्याची शक्यता आहे. याचा परिणाम राज्यपाल नियुक्त उमेदवारीवरही होऊ शकतो असं एनसीपीने म्हटलं आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button