breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

एकनाथ खडसेंना वाढीव वीजबिलाचा ‘शॉक’, बिलात सूट देण्याची मागणी

जळगाव | महावितरणच्या वाढीव वीज बिलाचा फटका सर्वसामान्यांसह दिग्गज लोकांना देखील बसला आहे. आता याचा फटका भाजपचे जेष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांनाही बसला आहे. मुक्ताईनगर येथील त्यांच्या राहत्या घराचे बिल एक लाखाहून अधिक रकमेचे आल्याने त्यांनी आपला संताप व्यक्त केला आहे. महावितरणने सर्व सामान्य जनतेला वेठीस धरू नये, बिलांमध्ये सूट द्यावी, अशी मागणी त्यांनी आता राज्य सरकारकडे केली आहे.

एकनाथ खडसे यांना एक लाख चार हजार इतके बिल आले आहे. हे बिल एप्रिल ते जुलै असं चार महिन्यांचं आहे. घराचे वीजबिल एक लाख चार हजार इतके आल्याने त्यांना मोठा धक्का बसला आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर आलेले लाईट बिल पाहून खडसे यांनी संताप व्यक्त केला आहे. महावितरणने बिल पाठवण्याअगोदर ती तपासून पाहायला हवीत. या बिलांमध्ये सवलत द्यायला हवी. सूट द्यायला हवी, असं खडसे यांनी म्हटलं आहे.

या बिलांची तपासणी करा, तसेच सूट द्या. महावितरणने ग्राहकांना विनाकारण वेठीस धरू नये अशी मागणी खडसे यांनी राज्य सरकारकडे केली आहे. महावितरणच्या वाढीव बिलाबाबत राज्यभरात अनेक ग्राहकांच्या तक्रारी आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button