breaking-newsमनोरंजन

सुशांत आत्महत्येप्रकरणी रियाच्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

मुंबई – अभिनेता सुशांत सिंह आत्महत्येप्रकरणी त्याची मैत्रीण रिया चक्रवर्ती हिच्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. सुशांतच्या वडिलांनी रियाविरोधात पाटण्यात एफआयआर दाखल केली होती. हेच प्रकरण मुंबईत हस्तांतरित व्हावे, अशी मागणी रियाने सर्वोच्च न्यायालयात याचिकेद्वारे केली होती. त्यावर आज निर्णय येण्याची शक्यता आहे. न्यायमूर्ती हृषिकेश राय हे या प्रकरणी निकाल देतील. गेल्या मंगळवारी झालेल्या सुनावणीनंतर सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय राखून ठेवला होता. दरम्यान, या निर्णयानंतरच सदर प्रकरणाचा तपास मुंबई पोलीस करणार की सीबीआय हे स्पष्ट होणार आहे.

मंगळवारी याप्रकरणी न्यायमूर्ती हृषिकेश राय यांच्या खंडपीठाने सुनावणी घेतली होती. यावेळी बिहार सरकारचे ज्येष्ठ वकील मनिंदर सिंह, महाराष्ट्र सरकारचे वकील ए. एम. सिंघवी, रियाचे वकील श्याम दिवाण आणि सुशांत सिंहच्या कुटुंबीयांचे वकील विकास सिंह यांनी आपली बाजू मांडली होती.

दरम्यान, सुशांतच्या वडिलांनी दाखल केलेल्या तक्रारीनंतर रिया आणि इतर काही जणांवर भारतीय दंड संविधानाअंतर्गत येणाऱ्या कलम ३०६, ३४१, ३४२, ३८०, ४०६, ४२० अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. याच प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान रियाने सर्वोच्च न्यायालयाकडे दाद मागत बिहार पोलिसांनी दाखल केलेली ही एफआयआर पूर्णपणे बेकायदेशीर असल्याचा मुद्दा मांडला होता. आता या प्रकरणाच्या तपासाबात सर्वोच्च न्यायालय नेमका कोणता निर्णय देणार याकडे कलाविश्वासह संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button