breaking-newsटेक -तंत्रताज्या घडामोडी

नॉन चायनीज स्मार्टफोनवर जबरदस्त मिळतेय सूट

नवी दिल्ली | ऑनलाइन शॉपिंग वेबसाइट अॅमेझॉन आणि फ्लिपकार्टवर ६ ऑगस्टपासून सेल सुरु झाला आहे. अॅमेझॉनचा सेल ७ ऑगस्टपर्यंत तर फ्लिपकार्टचा सेल १० ऑगस्टपर्यंत सुरू राहणार आहे. या सेलमध्ये जबरदस्त डिस्काउंट दिला जात आहे. नॉन चायनीज फोन खरेदी करायचा असेल तर फोन खरेदी करण्याची ही एक चांगली संधी आहे.

Apple iPhone 11
अॅपल आयफोन ११ च्या ६४ जीबी मॉडलला डिस्काउंटनंतर ५९ हजार ९९० रुपयांत खरेदी करता येवू शकते. याची ओरिजनल किंमत ६८ हजार ३०० रुपये आहे. या फोनवर ८ हजार रुपयांची सूट मिळत आहे. फोनमध्ये ६.१ इंचाचा डिस्प्ले, ड्यूल रियर कॅमेरा आणि फास्ट चार्जिंग मिळते.

Samsung Galaxy S10
८ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेजच्या Samsung Galaxy S10 ला अॅमेझॉनवर ४४ हजार ९९९ रुपयात खेरदी करता येवू शकते. तर याची किंमत ७१ हजार रुपये आहे. फोनमध्ये 16+12+12 मेगापिक्सल चा ट्रिपल रियर कॅमेरा आणि १० मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे.

LG V30+
फ्लिपकार्टवर या स्मार्टफोनवर ४० हजारांहून अधिक सूट दिली जात आहे. या फोनची किंमत ६० हजार रुपये आहे. परंतु, फ्लिपकार्टवर या फोनला १९ हजार ९९९ रुपयांत खरेदी करता येवू शकते. या फोनमध्ये ६ इंचाचा क्वॉड एचडी प्लस डिस्प्ले, आणि क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ८३५ प्रोसेसर मिळतो.

Motorola Razr (2019)
हा मोटोरोलाचा फोल्डेबल स्मार्टफोन आहे. या फोनवर २४ हजारांची सूट मिळत आहे. डिस्काउंटनंतर या फोनला फ्लिपकार्टवर १ लाख २४ हजार ९९९ रुपयांथ खरेदी केले जावू शकते. यात ६ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेज आणि 2510mAh बॅटरी मिळते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button