breaking-newsमहाराष्ट्रमुंबई

भांडुपमध्ये युवा क्रिकेटपटूची हत्या

मुंबईतील भांडुप येथे राकेश पनवार या स्थानिक क्रिकेपटूची तीन अज्ञात व्यक्तींनी हत्या केली. राकेशवर तीक्ष्ण हत्यारांनी वार करण्यात आले असून या प्रकरणामुळे भांडुपमध्ये खळबळ उडाली आहे.

राकेश पनवार हा गुरुवारी रात्री महावीर पेट्रोल पंपाजवळ आला असता तीन अज्ञात हल्लेखोरांनी त्याच्यावर तीक्ष्ण हत्यारांनी हल्ला केला. या हल्ल्यात त्याचा मृत्यू झाला. राकेश पनवार हा भांडुपमधील युवा क्रिकेटपटू होता. त्याने स्थानिक क्रिकेट स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी करत भांडुपमधील क्रीडा वर्तुळात छाप पाडली होती.

ANI

@ANI

Maharashtra: A local cricketer Rakesh Panwar was stabbed to death by three unknown assailants in Bhandup, Mumbai, last night. Police investigation underway.

४३ लोक याविषयी बोलत आहेत

राकेश पनवारच्या हत्येप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. राकेशची हत्या पूर्ववैमनस्यातून झाली का, त्याचा कोणाशी वाद होता का, याबाबत चौकशी सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button