breaking-newsताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय

कोलकाता येथील रिसर्च सेंटरच्या उद्घाटन प्रसंगी देशातील तणावपूर्वक घटनांवर नोबेल विजेते अमर्त्य सेन यांचं महत्त्वाचं विधान; म्हणाले…

कोलकाताः मला कोणत्या गोष्टीची भिती वाटते का?, असं जर कोणी मला विचारलं तर मी त्याला होय असंच उत्तर दिलं. माझ्या भीतीचं कारण ही देशातील सध्याची परिस्थिती आहे, अशा शब्दांत नोबेल पुरस्कार विजेते अमर्त्य सेन (amartya sen) यांनी सध्या देशात निर्माण झालेल्या परिस्थितीवरुन चिंता व्यक्त केली आहे. (amartya sen on nation crisis) कोलकाता येथील रिसर्च सेंटरच्या उद्घाटन कार्यक्रमासाठी अमर्त्य सेन पोहोचले होते. त्यावेळी झालेल्या कार्यक्रमात त्यांनी देशात निर्माण झालेल्या तणावपूर्व परिस्थितीवरुन चिंता व्यक्त केली आहे.

तसंच, देशातील स्थितीवर भाष्यही केलं आहे. लोकांनी एकजूट कायम ठेवली पाहीजे. धर्माच्या आधारावर विभागणी करणं चुकीचे आहे, असं अमर्त्य सेन यांनी म्हटलं आहे. देश एकजूट राहवा, अशी माझी इच्छा आहे. ऐतिहासिकदृष्ट्या देशाची फाळणी नको आहे. एकजुटीने काम करावे लागेल. भारत केवळ हिंदू किंवा मुस्लिमांचा असू शकत नाही. आपल्याला देशाच्या पंरपरेनुसार एकजूट राहण्याची गरज आहे. भारत कधीच हिंदूचा किंवा होऊ शकत नाही किंवा मुसलमान कधीच एकटे भारत निर्माण करु शकत नाही. सर्वांना एकत्र काम करण्याची गरज आहे, असंही त्यांनी म्हटलं आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button