breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

उस्मानाबादच्या उमरगा तालुक्यात आढळला कोरोनाचा पहिला रूग्ण

उस्मानाबाद | महाईन्यूज | प्रतिनिधी

जिल्ह्यात कोरोनाचा पहिला पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला आहे. बुधवारी उमरगा येथील उपजिल्हा रुग्णालयात त्याला दाखल करण्यात आले. गुरुवारी स्वब तपासणीनंतर त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

ही व्यक्ती दिल्ली ते पानिपत अशा सहलीला गेला होता, अशी माहिती आहे. गेल्या पाच-सहा दिवसांपासून तो गावात आहे, अशी माहिती गावकऱ्यांनी दिल्याने त्याच्या संपर्कात आलेल्या नागरिकांची माहिती घेण्याचे काम सुरू असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक यांनी सांगितले.

जिल्ह्यातील १३६ नागरिकांना क्वारंटाइन करण्यात आले आहेत. यातील तेराजण हे रुग्णालयामध्ये दाखल आहेत. जिल्ह्यामध्ये परजिल्ह्यातून; तसेच परदेशातून येणाऱ्यांची संख्या मोठी असल्याने धोका वाढला होता. आता पहिला रुग्ण आढळला असून, यापुढे ही साखळी थांबविण्याचे मोठे आव्हान आता प्रशासन तसेच आरोग्य विभागासमोर असणार आहे . बाहेरून आलेल्या नागरिकांचा बुधवारपर्यंतचा आकडा सुमारे ५५ हजारांच्या जवळपास गेला होता. त्यावरून कोरोना विषाणूचा धोका जिल्ह्यामध्ये बळावणार असल्याचे सांगितलं जात आहे.

दिल्लीतील रुग्णाशी संपर्क आल्याच्या संशयावरून जिल्ह्यातील सात जणांची यादी जिल्हा प्रशासनाकडे पाठविण्यात आली होती. त्यापैकी दोघांचे स्वब तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यांचे अहवाल जिल्हा शल्यचिकित्सकांना प्राप्त झाले असून दोघांचेही अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

दिल्लीतील कार्यक्रमामध्ये सहभागी लोकांचा शोध घेतला जात असला, तरी जिल्ह्यातील कोणत्याही व्यक्तीचा थेट संबंध त्या कार्यक्रमाशी नसल्याचे आता स्पष्ट झाले आहे. ज्या लोकांची यादी प्रशासनाला मिळाली होती, त्याचा शोध घेतला तेव्हा ही माहिती समोर आली होती. पण यामुळे एकूणच जिल्ह्यामध्ये एकप्रकारची भीती निर्माण झाली होती. मात्र, आता अहवाल प्राप्त झाल्यानंतर आरोग्य विभागासह प्रशासनाला दिलासा मिळाला तोच बुधवारी रात्री पाठविलेल्या स्वबचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे .

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button