breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

कोरोना लसीकरण : नगरसेविका माया बारणे यांची घरोघरी जनजागृती

पिंपरी । प्रतिनिधी

कोरोना संसर्ग होऊ नये यासाठी प्रत्येकजण आपापल्या परीने दक्षता घेत आहे, मात्र जेष्ठ नागरिकांसाठी सुरू असलेली प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिम तळागाळापर्यंत पोहचविण्याचा थेरगावातील नगरसेविकेने जणू विडाच उचलल्याची प्रचिती येत आहे. जीव धोक्यात घालून सुरू असलेल्या त्यांच्या या कामाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

गणेशनगर, थेरगावच्या नगरसेविका व माजी विरोधी पक्षनेते संतोष बारणे यांच्या पत्नी माया बारणे यांनी गेल्या महिन्याभरापासून पायाला भिंगरीच लावली आहे कोरोनाचा मोठा प्रादुर्भाव  वाढत असतानाच घरात आराम करण्याऐवजी धोका पत्करून त्या प्रभागातील एक-एक घर पालथे घालत आहेत, लसीकरणाबाबत जनजागृती करीत नागरिकांना लसीकरणासाठी तयार करीत आहेत.

ज्येष्ठ नागरिकांसाठी सुरू असलेल्या कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाबाबत अनेक समज-गैरसमज आहेत. त्यामुळे अनेकांनी लसीकराणाकडे सपशेल पाठ फिरवीली आहे, त्यातच थेरगाव परिसरात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत त्यामुळे बारणे यांनी हा धाडसी निर्णय घेत पायी जनजागृती मोहीम हाती घेतली आहे. त्या सकाळी ९ वाजताच घर सोडुन अन्य दोन महिला सहकाऱ्यांसह मोहिमेला सुरुवात करतात.

घरोघर जाऊन ४५ वर्षांवरील व जेष्ठ नागरिकांची माहिती घेत त्यांना ही लस कशी फायदेशीर आहे हे समजावून सांगुन त्यांचे मन वळवितात एवढेच नव्हे तर येथील खिवंसरा पाटील मनपा प्रशालेत सुरू असलेल्या लसीकरणाला जाण्यासाठी त्यांनी वाहनाची देखील सोय केली आहे.आजवर लसीकरणाकडे पाठ फिरवीत अलिप्त राहीलेल्या दिड हजाराहून अधिक जेष्ठ नागरिकांना लस देण्यात त्या यशस्वी ठरल्या असून त्यांचा हा नित्य दिनक्रम अविरत सुरू आहे.

लोकप्रतिनिधी म्हणून माझी ती जबाबदारी: माया बारणे

लोकांचे हित, सुरक्षा ही मी माझे आद्य कर्तव्य, जबाबदारी मानते. कोरोनाचे संकट ओढावल्यापासून मी व माझे पती संतोष बारणे यांनी सतत लोकांसाठी अनेक उपाय योजना राबवित मदत केली आणि करतो आहे. मात्र अशा संकटात घराबाहेर पडून लोकांसाठी काहीच नाही केले तर लोकप्रतिनिधी म्हणून मिरविण्यात काय अर्थ आहे?

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button