breaking-newsक्रिडा

उपांत्य फेरीच्या आव्हानासाठी मेरी कोम, लव्हलिना सज्ज

जागतिक महिला बॉक्सिंग स्पर्धा

आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय बॉक्सर्सची खालावलेली कामगिरी यंदाच्या विश्वचषकात उंचावणार, हे निश्चित झाले आहे. भारताचे चार बॉक्सर्स उपांत्य फेरीत पोहोचल्याने किमान चार पदके निश्चित झाली असली तरी त्यापेक्षाही अधिक चमकदार पदकासाठी भारतीय महिला बॉक्सर्स गुरुवारी झुंजणार आहेत.

मेरी कोम (४८ किलो), लव्हलिना बोर्गोहेन (६९ किलो), सोनिया चहल (५७ किलो) आणि सिमरनजित कौर (६४ किलो) यांनी दमदार कामगिरी करत भारताच्या आशा उंचावल्या आहेत. भारताचे उच्च कामगिरी संचालक सांतियागो निएवा यांनी भारतीय महिला बॉक्सर्सच्या कामगिरीवर समाधान व्यक्त केले. ‘‘काही निर्णय मनासारखे लागले नाहीत. तरीदेखील भारताची कामगिरी उत्साहवर्धक आहे. त्यात मेरी कोमची कामगिरी विशेष आहेच, त्याचबरोबर अन्य मुलींनीदेखील त्यांची ताकद दाखवून दिली आहे,’’ असे नमूद केले.

१० वजनी श्रेणींमध्ये एकूण ४० महिला उपांत्य फेरीत पोहोचल्या आहेत. त्यात सर्वाधिक ५ चीनच्या, ४ भारताच्या तर उत्तर कोरिया, तुर्की आणि अमेरिकेच्या प्रत्येकी तीन बॉक्सर्सचा समावेश आहे. भारताने २००६ मध्ये मायदेशातील स्पर्धेत सर्वोत्तम कामगिरी करताना चार सुवर्णपदकांसह आठ पदके पटकावली होती. त्यानंतर २००८ मध्ये चार, २०१० आणि २०१४ मध्ये दोन, २०१२ आणि २०१६ मध्ये एक पदक पटकावले आहे. २०१० मध्ये मेरी कोमच्या सुवर्णपदकानंतर भारताला अद्याप सुवर्णपदकावर नाव कोरता आलेले नाही. जर शनिवारी मेरी कोमने सुवर्णपदकाला गवसणी घातली तर सहा सुवर्णपदके पटकावणारी मेरी कोम ही महिला बॉक्सिंगच्या इतिहासातील सर्वोत्तम खेळाडू ठरणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button