breaking-newsआंतरराष्टीय

भुयारी रेल्वे रासायनिक हल्ल्यात सामील 7 जणांना जपानने फासावर लटकावले

टोकियो (जपान) – भुयारी रेल्वे रासायनिक हल्लयात सामील 7 जणांना जपानने शुक्रवारी फासावर लटकावले. 20 मार्च 1995 रोजी जपानमधील भुयारी रेल्वेच्या पाच डब्यांत नर्व्ह एजंट सरीनचा वापर करून केलेल्या हल्ल्यात 13 जण मरण पावले होते, आणि 5,800 जण जखमी झाले होते. जपानमधील रोपोंगी सबवे स्टेशनवर सकाळी गर्दीच्या वेळी हा हल्ला करण्यात आला होता. सरीन फवारल्यानंतर लोकांना गंधकासारखा वास आला. श्‍वास घेण्यास त्रास होऊ लागला, अनेकजण जमिनीवर कोसळले. त्यांच्या तोंडातून फेस आणि नाकातून रक्त वाहू लागले. भुयारी रेल्वेतील या रासायनिक हल्ल्याने सारे जग हादरून गेले होते. सरीन हे अत्यंत घातक रसायन असून त्याच्या संपर्कात आल्यानंतर 1 ते 10 मिनिटांत माणसाला मृत्यू येतो.

या हल्ल्याची योजना शिन्यारिको संप्रादायाचे प्रमुख शोको असहारने बनवली होती. त्यालाच सर्वात प्रथम फासावर लटकवण्यात आले. दोषींना फाशी देण्याच्या वृत्ताने अनेक पीडितांनी समाधान व्यक्‍त केले आहे. त्या ह्ल्लयात जखमी झालेले चित्रपट दिग्दर्शक अत्सुशी सकाहर यांनी दोषींना फाशी दिल्यबद्दल समाधान व्यक्‍त केले आहे.

जपानचे न्याय मंत्री योको कामिकावा यांनी पत्रकार परिषदेत, फासावर लटकवण्यात आलेल्या 7 अपराध्यांची नावे वाचून दाखवली. त्यांच्या अपराधाने जपानच नाही, तर संपूर्ण जगाला धक्का बसल्याचे त्यांनी सांगितले.

उम शिन्यारिको संप्रदायाची स्थापना करणाऱ्या शोको असहाराने या हल्ल्याची योजना तयार केली होती. शोको अंशिक प्रमाणात अंध होता. 1987 साली स्थापन केलेल्या त्याच्या पंथाचे सुमारे 10,000 अनुयायी होते. 2004 साली दोषींना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. तिची अंमलबजावणी शुक्रवारी करण्यात आली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button