breaking-newsक्रिडा

क्रिकेट अकादमीच्या उद्घाटनप्रसंगी महेंद्रसिंग धोनी यांची शाब्दिक फटकेबाजी

खेळाडूंशी दिलखुलास संवाद

नागपूर : वर्धा मार्गावरील गायकवाड पाटील इंटरनॅशनल स्कूलमध्ये देशातील पहिल्या एम.एस. धोनी निवासी क्रिकेट अकादमीचे उद्घाटन भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याच्या हस्ते बुधवारी झाले. यावेळी अकादमीतील खेळाडूंशी धोनीने संवाद साधला आणि त्यांच्या प्रश्नांवर चांगलीच फटकेबाजी करीत उपस्थितांची मने जिंकली.

सामन्यादरम्यान प्रेक्षकांचे आणि खेळाडूंच्या हृदयाचे ठोके वाढले असताना तुम्ही एकदम ‘कूल’ दिसता? त्यासाठी तुम्ही काय तयारी करता, असा सवाल अकादमीतील मध्यप्रदेशच्या सानिया चौरसियाने धोनीला केला. त्यावर हजरजबाबी धोनीने सुरुवातीला गमतीदार उत्तर देताना ‘मी फ्रीजमध्ये आराम करतो’ असे सांगितले. त्यावर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. त्यानंतर धोनीने त्यांच्या शांत मन:स्थितीचे गुपित सांगितले. सामन्यात अटीतटीच्या प्रसंगात दबाव असतो. मात्र, तो प्रकट केल्याने तुम्ही अडचणीत येऊ शकता. त्यामुळे अशावेळी एक सर्वसाधारण रणनीती अखलेली असते. त्यावर मी भर देतो,  असे तो म्हणाला.

२००७ मध्ये पाकिस्तान विरुद्ध ट्वेंन्टी- २० सामन्यात अखेरचे षटक तुम्ही जोिगदर सिंगला देण्यामागे काय  हेतू होता, असा सवाल  प्रवीणसिंग राजपूतने केला असता त्यावेळी केवळ जोिगदरचेच एक षटक शिल्लक होते. त्यावेळी अनेक पर्याय होते मात्र, मिसबा तेव्हा फलंदाजी करीत होता आणि त्याने २००४ साली फिरकीपटूंना चांगलेच फटके मारले होते. तेव्हाही मी यष्टिरक्षक होतो. त्यामुळे मला मिसबाच्या फलंदाजीचा अभ्यास होता. त्यामुळे त्याला रोखण्यासाठी मी जोगिंदरसिंगकडे चेंडू दिला व त्याने मिसबाला बाद करून माझा निर्णय सार्थक ठरला. यष्टिरक्षकासाठी महत्त्वाचे काय असते, या चवानी कोडवानेच्या प्रश्नावर धोनी म्हणाला, यष्टिरक्षण करताना एकाग्रता फार महत्त्वाची असते. तसेच यष्टिरक्षक नेहमी संघाचा उपकर्णधार असतो. फलंदाज कसा खेळतो आणि त्याची कमकुवत बाजू कोणती आहे, हे तो जवळून बघत असतो आणि तशा सूचना तो गोलंदाजाला देतो. धावपट्टीवर चेंडू किती हालतो आहे, यावरही त्याचे लक्ष असते आणि आवश्यक ते बदल करण्यास तो कर्णधाराला सांगतो. यष्टिरक्षक हाच कर्णधार असेल तर अनेक निर्णय घ्यावे लागतात. फलंदाजीचा क्रम गोलंदाजीतील बदल कोणता खेळाडू कसा खेळू शकतो, आदीचा त्यात समावेश असतो.

अकरा खेळाडू निवडताना कसरत

भारतीय संघ निवडीबाबत शुभम झाने विचारलेल्या प्रश्नांवर धोनी म्हणाला, खेळाडूच्या रणजी, दुलिप, देवधर चषकातील कामगिरीचा अभ्यास केला जातो. त्यांच्या कामगिरीतील सातत्य पाहिले जाते. संघ निवडताना अडचणी येत नाही मात्र, पंधरा खेळाडूंमधून अंतिम अकरांची निवड करताना कसरत होते. कोणत्या देशात कोणता खेळाडू चांगली कामगिरी करू शकेल, याचाही विचार केला जातो. एक समतोल संघ निवडण्याचा प्रयत्न असतो.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button