breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपुणे

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून सीरम इन्स्टिट्यूटची पाहणी

आगीमध्ये मृत्यूमुखी पडलेल्या कर्मचाऱ्यांना वाहिली श्रद्धांजली

कोविड लस निर्मिती अन्‌ लस साठा सुरक्षित असल्याचा दावा

 

पुणे । प्रतिनिधी

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियामधील आग लागलेल्या इमारतीची पाहणी केली. इमारतीला लागलेली आग आटोक्यात आली असून, आगीत पाच कामगारांचा मृत्यू झाला आहे.

तसेच, कोविडप्रतिबंधक लसनिर्मिती आणि लससाठ्यांचा आग लागलेल्या इमारतीशी कोणताही संबंध नाही. कोविड लस कार्यक्रम पूर्णपणे सुरक्षित आहे, असा दावा उपमुख्यमंत्री पवार यांनी केला आहे.

शुक्रवारी सकाळी संबंधित तज्ञांच्या पथकांकडून दुर्घटनेतील प्रत्येक मजल्याची तपासणी करण्यात येईल. आगीचे कारण अद्याप अस्पष्ट असून उद्या तज्ञांच्या पथकांकडून पाहणी केल्यानंतरच आगीचे कारण स्पष्ट होऊ शकेल. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाच्या अधिकारी-जवानांनी उत्तम कामगिरी केली.

सदर इन्स्ट्यिट्यूट ‘एसईझेड’ क्षेत्रात असून इन्स्टिट्यूट इमारतीचे फायर ऑडीट, एनर्जी ऑडीट तसंच इतर आवश्यक तपासण्यांची पुर्तता करण्यात आली होती का, याचीही चौकशी करण्यात येईल, असेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे.

पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूट इमारतीला लागलेली आग विझवण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू आहेत. शहर आणि जिल्हा प्रशासनाच्या सर्व संबंधित यंत्रणा आग विझवण्याचा प्रयत्न करीत आहेत. पुणे आयुक्तांकडून मी यासंदर्भातली माहिती घेतली असून दुर्घटनेच्या सखोल चौकशीचे निर्देश देण्यात आले आहेत.

कोरोना प्रतिबंधक लस निर्मितीचा प्रकल्प सुरक्षित असल्याचं मला सांगण्यात आलं आहे. सद्यस्थितीत आग विझवणं आणि दुर्घटनेमुळे होणारी हानी नियंत्रित ठेवणं यास सध्या प्राधान्य देण्यात येत आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button