breaking-newsपिंपरी / चिंचवड

उद्योगनगरीत पावसाची फटकेबाजी, पिंपरी-चिंचवडकरांना दिलासा

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

गेली पंधरा दिवस दडी मारून बसलेल्या पावसाने अखेर जोरदार फटकेबाजी सुरु केली आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये काल रात्रीपासून पावसाला सुरुवात झाली. आज दुपारपर्यंत समाधानकारक पाऊस झाल्याने नागरिकांना काहिसा दिलासा मिळाला आहे.

आजपर्यंत मोठ्या प्रमाणात होणा-या पाऊसाने दडी मारल्याने पिंपरी-चिंचवडकरांची चिंता वाढली होती. कारण, शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरणामध्ये पाणीसाठा अपुरा असल्याने सर्वांना पावसाची प्रतीक्षा लागली होती. काल रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला पावसाने हळुवारपणे सुरुवात केली. रात्री कधी मोठा तर कधी थोड्या प्रमाणामध्ये पाऊस बरसत होता. मात्र, आज सकाळपासूनच पावसाने जोरदारपणे सुरुवात केली. दुपारी साडेबारा वाजेपर्यंत समाधानकारक पाऊस झाला. त्यामुळे पिंपरी-चिंचवड करांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

पिंपरी-चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरण परिक्षेत्रात समाधानकारक पाऊस असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे धरणामध्ये मोठ्या प्रमाणात पाणीसाठा उपलब्ध झाल्यास शहराची तहान भागणार आहे. जर पावसाने आणखी दडी मारल्यास धरणातील पाणीसाठा मर्यादित होऊन शहरवासीयांची चिंता पुन्हा वाढणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button