breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
#CoronaVirus: राज्यपालांचा निर्णय; वर्षभराच्या वेतनातील ३० टक्के रक्कम ‘पीएम केअर्स फंड’ला
महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी करोनाच्या पार्श्वभूमीवर वेतनातील ३० टक्के रक्क पीएम केअर्स फंडाला देणार असल्याचा निर्णय घेतला आहे. वर्षभराच्या वेतनातील ३० टक्के रक्कम राज्यपाल कोश्यारी हे मदतीसाठी देणार आहेत. यापूर्वी त्यांनी एक महिन्याचे वेतन पीएम केअर्स फंडला दिलं आहे.
करोनाच्या वैश्विक संकटाचा मुकाबला करण्यासाठी संपूर्ण वर्षभर आपले ३० टक्के वेतन पंतप्रधान निधीला (पीएम केअर्स फंड) देण्याची घोषणा आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केली. मार्च महिन्याचे वेतन पंतप्रधान निधीला देत असल्याचे राज्यपालांनी यापूर्वीच जाहीर केले आहे. pic.twitter.com/k4php5ZiJQ
— Governor of Maharashtra (@maha_governor) April 6, 2020