breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

‘उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होणे महाराष्ट्राची गरज’, मातोश्रीबाहेर लागले फलक

मुंबई – ठाकरे कुटुंबीय राहत असलेल्या मातोश्री निवासस्थानाबाहेर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होणे महाराष्ट्राची गरज आहे, अशा आशयाचे नवीन होर्डिंग सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनी रविवारी पुन्हा एकदा शिवसेनेचाच मुख्यमंत्री होणार असल्याचे ठासून सांगितले.

काही दिवसांपूर्वी मातोश्रीबाहेर आदित्य ठाकरे यांच्या समर्थनात ‘माझा आमदार, माझा मुख्यमंत्री’ असे लिहिलेले होर्डिंग्ज लावण्यात आले होते. त्यानंतर आता थेट उद्धव ठाकरे यांचेच मुख्यमंत्रिपदाचे होर्डिंग लावण्यात आले आहे. शिवसेनेचा मुख्यमंत्री व्हावा ही शिवसैनिकांची इच्छा आहे.. शिवसेना पक्षप्रमुख मा. उद्धवसाहेब ठाकरे मुख्यमंत्री होणे ही महाराष्ट्राची गरज आहे. आपला नम्र, शिवसैनिक असे या होर्डिंगवर लिहिण्यात आलेले आहे. 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button