breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

Farmers Suicide: आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या कुटुंबियांना विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांची भेट

पाथर्डी । महाईन्यूज । प्रतिनिधी

विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी आज पाथर्डी तालुक्यातील भारजवडी या गावात काल आत्महत्या केलेले कर्जबाजारी शेतकरी मल्हारी बटुळे यांच्या घरी जाऊन कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. यावेळी भाजपच्या वतीने आत्महत्याग्रस्त बटुळे कुटुंबियांना एक लाखाची मदत दरेकर यांनी सूपूर्द केली. त्याचप्रमाणे बटुळे यांच्या तीनही मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी भाजप उचलणार असल्याचे प्रविण दरेकर यांनी स्पष्ट केले. राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार संवदेनहीन असून सरकारची सरसकट कर्जमाफीची घोषणा फसवी असल्याची टीका दरेकर यांनी केली.

कर्जबाजारी शेतकरी मल्हारी बटुळे यांनी काल रात्री आत्महत्या केली. त्यानंतर विरोधी पक्ष नेते दरेकर यांनी आज तातडीने पाथर्डी येथे आत्महत्याग्रस्त मल्हारी बटुळे यांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. बटुळे यांच्या पत्नीसाठी शासकीय नोकरीसाठी प्रयत्न करणार असल्याचेही दरेकर यांनी सांगितले. यावेळी आमदार मोनिका राजळे यांनीही बटुळे यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले.

त्यानंतर प्रसिध्दी माध्यमांशी बोलताना प्रविण दरेकर यांनी महाविकास आघीडी सरकारवर जोरदार टीका केली. हे सरकार संवेदनहिन सरकार असून राज्यातील बळीराजा कर्जामुळे आत्महत्या करीत आहे, पण या सरकारला व त्या सरकारमधील मंत्र्यांना त्याचे सोयरसुतक नाही. चोवीस तास उलटूनही सरकारमधील कृषी मंत्री, पालकमंत्री वा एकही मंत्री बळीराजाच्या कुटुंबियांची भेट घेण्यास आलेला नाही. यामध्येच सरकारची शेतक-यासाठी असलेली अनास्था दिसून येते.

महाविकास आघाडी सरकारने घोषित केलेली सरसकट कर्जमाफी फसवी आहे, त्यामुळे शेतक-याचे काहीही भले झालेले नाही. सरकारने बळीराजाला सरसकट कर्जमाफी दिली असती तर आज या शेतक-याला आपला जीव गमवावा लागला नसता अशीही खंतही दरेकर यांनी व्यक्त केली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button