breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

उदयनराजेंनी मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचं नेतृत्त्व करावं, मेटेंची मागणी

बीड – मराठा आरक्षणप्रकरणी सध्या राज्यात राजकारण तापलं आहे. त्यापार्श्वभूमीवर मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचं नेतृत्व उदयनराजे भोसले यांनी करावं अशी मागणी शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक मेटे यांनी केलंय. चकूर तालुक्यातील बोरगाव येथील किशोर कदम या युवकाने मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केली. विनायक मेटे यांनी आज कदम कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांना धीर दिला. त्यानंतर मेटे प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

मराठा आरक्षणलाा सर्वोच्च न्यायालयात अंतरिम स्थगिती मिळाली आहे. त्यानंतरही राज्य सरकारने काहीच हालचाल केली नाही. पाच-सहा दिवस उलटून गेले आहेत. पोकळ आश्वासनापलिकडं या सरकारकडून मराठा समाजाला कोणतंही ठोस आश्वासन दिलेलं नाही, असं सांगतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दिलेली आश्वासनं पोकळ असल्याची टीका मेटे यांनी केली.

मराठा आरक्षणासाठी अध्यादेश काढला पाहिजे, असं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितलं. या व्यतिरिक्त पवारांनी मराठा आरक्षणावर काहीच भाष्य केलं नाही. ते बोलायलाही तयार नाहीत, अशी टीकाही मेटे यांनी केली. या पार्श्वभूमीवर आता उदयनराजे यांनीच आता मराठा आरक्षणसााठी पुढाकार घ्यावा. मराठा समाजाच्या भल्यासाठी त्यांनी आंदोलनाची पुढील दिशा ठरवून नेतृत्व करावे. राज्यातील संपूर्ण मराठा समाज त्यांच्या नेतृत्वाखाली काम करेल, असं त्यांनी सांगितलं. मराठा आंदोलन सर्वोच्च न्यायालयात टिकलं पाहिजे. समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे. त्यासाठी ठोस भूमिका असायला हवी. एकवाक्यता असायला हवी. कृती आराखडा असायला हवा. त्यासाठी कुणी तरी पुढाकार घेण्याची गरज आहे, असेही ते म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button