breaking-newsताज्या घडामोडीपुणे

उदयनराजेंचा भाचा असल्याचे सांगून ‘त्याने’ केला काेल्हापूरात दूसरा विवाह

कोल्हापूर – पहिल्या लग्नाची माहिती लपवून तरुणीशी दुसरे लग्न करून ती व तिच्या नातेवाईकांची २९ लाखांची फसवणूक करणाऱ्या संशयितावर करवीर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. विश्‍वनाथ शहाजी घाटगे (वय ३०, रा. वाघापूर, ता. भुदरगड) असे त्याचे नाव आहे.

संशयित विश्‍वनाथ घाटगे याने संकेतस्थळावरून एका तरुणीशी ओळख निर्माण केली. स्वतःचा गुळाचा व्यवसाय असल्याचे सांगून त्या तरुणीशी प्रेमसंबंध निर्माण केले. त्यानंतर त्याने स्वतःच्या पहिल्या लग्नाची माहिती लपवून त्या तरुणीशी लग्न केले. त्याने विश्‍वास संपादन करून गूळ व्यवसायासह अन्य कारणांसाठी संबंधित तरुणी व तिच्या नातेवाईकांकडून २९ लाख २५ हजार रुपये घेऊन फसवणूक केली.

हा प्रकार मार्च ते २७ डिसेंबर २०२० अखेर आर.के.नगर येथे घडला. त्याने आपण खासदार उदयनराजे भोसले यांचा भाचा असल्याचेही खोटे सांगितले होते, असे निर्मला मधाळे यांनी फिर्यादीत म्हटल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. त्यावरून विश्वनाथ घाटगे याच्यावर रविवारी (ता.27) फसवणुकीचा गुन्हा नोंद झाला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button