breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

उत्पादित मालाचे बचत गटांनी मार्केटिंग करावे – आमदार लक्ष्मण जगताप

सांगवीत पवनाथडी जत्रेचे उदघाटन

पिंपरी ( महा ई न्यूज ) – शहरातील महिला बचत गटांना पाठबळ देणे, याकरिता पवनाथडी जत्रा भरविण्यात येत आहे. या जत्रेतून बचत गटांनी आपल्या व्यवसायासाठी मार्केटिंग करणे गरजेचे आहे, असे मत आमदार लक्ष्मण जगताप यांनी व्यक्त केले.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका नागरवस्ती विकास योजना विभागाच्या वतीने नवी सांगवीत दि.०४ ते ०८ जानेवारी २०१९ कालावधीत पवनाथडी जत्रा भरली आहे. त्या जत्रेचे उदघाटन आंतरराष्ट्रीय नेमबाज अंजली भागवत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महापौर राहुल जाधव होते.
या कार्यक्रमास उपमहापौर सचिन चिंचवडे, स्थायी समिती सभापती ममता गायकवाड, सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, विधी समिती सभापती माधुरी कुलकर्णी आदी उपस्थित होते.

आमदार जगताप म्हणाले, महिला सबलीकरणासाठी पवनाथडी जत्रेचे आयोजन केले जाते. महानगरपालिकेमधील पदाधिकारी व अधिका-यांनी महिलांच्या सबलीकरणासाठी प्रयत्न करावेत. गेली अनेक वर्षे पवनाथडीचे आयोजन करून देखील महिलांना कायमस्वरूपी रोजगार उपलब्ध करून देण्यात यश न आल्याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली. पवनाथडी जत्रेचा उद्देश साध्य होत नसल्यास पुढील वर्षी पवनाथडी जत्रेचे आयोजन करावे कि नाही याबाबत विचार करावा लागेल, असेही ते म्हणाले.

अंजली भागवत म्हणाल्या, पवनाथडी म्हणजे उद्योजक महिलांचे ऑलिम्पिक असल्यासारखेच आहे. पवनाथडीच्या माध्यमातून महिला उद्योजकांना उत्तम बाजारपेठ उपलब्ध करून दिली जात आहे. महिला उद्योजकांनी व्यवसायामध्ये आत्माविश्वासाने पुढे जावे असेही त्या म्हणाल्या.

महापौर राहुल जाधव म्हणाले, शहरातील कला-कौशल्य असलेल्या महिलांना हक्काची बाजारपेठ देण्यासाठीपवनाथडी जत्रेचे आयोजन करण्यात येते. पवनाथडी जत्रेमुळे अनेक महिला बचत गटांना चालना मिळाली व स्वतंत्र अशी ओळख मिळाली. शहरातील नागरिकांनी आपल्या शहरातील महिला उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी पवनाथडी जत्रेला भेट द्यावी.

यावर्षी पवनाथडी जत्रेमध्ये ३६१ सर्वसाधारण स्टॉल्स, २४७ शाकाहारी खाद्यपदार्थांचे स्टॉल्स तर २०५ मासांहारी खाद्यपदार्थांचे स्टॉल्स असे एकूण ८१३ स्टॉल्स आहेत. उपमहापौर सचिन चिंचवडे यांनी आभार मानले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button