breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

कोरोनापासून वाचण्यासाठी पंतप्रधान करणार जनआंदोलन!

नवी दिल्ली – देशात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी या कोरोना विरोधात जनआंदोलन छेडणार आहेत. कोरोनापासून वाचण्यासाठी स्वत:ला आणि कुटुंबाला वाचवण्यासाठी पंतप्रधानांकडून शपथ दिली जाणार आहे. देशात ६७ लाखाहून अधिक जण कोरोना वायरसच्या संपर्कात आले आहेत. पण यातून बरे होणाऱ्यांची संख्या देखील मोठी आहे.हिवाळा आणि त्यात आलेल्या सणांमध्ये कोरोना वेग वाढू नये यासाठी पंतप्रधान जनतेला आवाहन करणार आहे. मास्क वापरणे, दोन फुटांचे अंतर आणि सतत हात धुवण्याचा संदेश पंतप्रधान देणार आहेत.

कोरोनातून बरे होणाऱ्यांची संख्या ८५.०२ टक्क्यांवर पोहोचलीय. पंतप्रधानांच्या नव्या मोहिमेतून १३५ कोटी भारतीयांना कोरोना विरोधात लढण्याची शपथ दिली जाईल. देशवासिय कोरोनापासून स्वत: आणि कुटुंबाचा बचाव करण्याची शपथ घेतील.

WHO ने दिलेल्या माहितीनुसार, ९ कोरोना व्हॅक्सीन पाइपलाइनमध्ये आहे. त्यामुळे लस बाजारात आल्यावर त्याचं समान वाटप होणं हे आव्हान आपल्यासमोर आहे. आतापर्यंत १६८ देश या कोवॅक्स फॅसिलिटीत सहभागी झाले आहेत. फक्त चीन, अमेरिका आणि रशिया या देशांचा यामध्ये समावेश नाही.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button