breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणेमहाराष्ट्रराजकारण

“..तेव्हा हा दाढीवाला पैलवान जिंकणार याची खात्री होती”; एकनाथ शिंदे

महेश दादा काय पण करू शकतात

हजारो जत्रा पाहिल्या पण अशी जत्रा पाहिली नाही

भोसरी : भोसरी विधानसभा मतदार संघाचे आमदार तथा भाजपचे शहराध्यक्ष महेश लांडगे आणि शिवांजली सखी मंचच्या अध्यक्षा पूजा महेश लांडगे यांच्या संकल्पनेतून ‘इंद्रायणी थडी’ या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे समारोपासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे महेश लांडगे यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला.

हजारो जत्रा पाहिल्या पण अशी जत्रा पाहिली नाही. महेश दादा काय पण करू शकतात, असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं. या महोत्सवात बाल जत्रा आहे, ग्राम संस्कृती आहे, भारतीय संस्कृती आणि परंपरा पुढे नेणारा हा उपक्रम आहे, असंही एकनाथ शिंदे म्हणाले.

इंद्रायणी थडीच्या समारोपाला मी आलो. आपल्या सर्वांना महेश दादांनी मोठा व्यासपीठ उपलब्ध करून दिला, सुरूवातीलाच भव्य अशी श्रीराम मंदिराची भव्य प्रतिकृती उभारली आहे, भजन महोत्सव देखील साजरा केला, खाद्य महोत्सवात सर्व पदार्थांचा आस्वाद घेण्याची संधी आपल्याला मिळाली या बद्दल मी महेश दादांचे आभार मानतो, असही एकनाथ शिंदे म्हणाले.

मी जर आलो नसतो तर या महोत्सवाला मुकलो असतो. वीस लाख लोकांनी हजेरी लावली हे कमी नाही. अनेक महिलांना या महोत्सवामार्फत रोजगाराती संधी मिळाली. अशा महोत्सावाचे आयोजन ही काळाची गरज आहे. आमचे सरकार काम करणारे सरकार आहे. सर्वासामान्य जनतेला काम देण्याचे काम हे सरकार करत आहे, असंही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

भोसरी हे ऐतिहासिक शहर असून येथे पैलवानांचा मोठा इतिहास आहे. २०१४ ला महेश दादा माझ्याकडे आले होते. तेव्हा हा दाढीवाला पैलवान जिंकणार याची खात्री होती. ज्याला पारकच नाही तो काय करू शकतो, असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना लगावला. आता आपण एकच आहोत तुमच्यासाठी काम करणारा हा मुख्यमंत्री आहे. आपले सर्व आमदार काम करतात. वीस लाख लोकांना एकत्र आणण्याची जादू महेश दादांनी केली आहे. त्यामुळे मी त्यांचं अभिनंदन करतो. पिंपरी-चिंचवडचा कायापालट आपल्याला करायचा आहे, असंही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button