breaking-newsTOP NewsUncategorizedताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

अब्दुल सत्तार हिरवा साप होते, आता रंग बदलणारा सरडा, खैरेंची सडकून टीका

औरंगाबाद : शिवसेनेतून बंड पुकारलेले राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांना देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेत आणलं असा गौप्यस्फोट शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी केला. ‘मी जेव्हा सिल्लोडमध्ये भाषण करायचो तेव्हा मी त्यांना जाहीर सभेत हिरवा साप म्हणायचो. मात्र, आता ते रंग बदलणारा काळा सरडा झाले आहेत. अशी जहरी टीका शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी औरंगाबादेत पत्रकारांशी बोलताना केली. आज औरंगाबादेत शिवसेनेने शक्ती प्रदर्शन करीत वाहन रॅली काढली होती. यावेळी ते बोलत होते.

राज्यमंत्री अब्दुल सत्तार हे काँग्रेसमध्ये असताना शिवसेनेकडून त्यांना हिरवा साप म्हणून टीका करण्यात यायची. मात्र, शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर शिवसैनिक व पदाधिकाऱ्यांनी त्यांना सामावून घेतल्याचे चित्र होते. मात्र, आता त्यांनी मंत्रिपद असताना देखील एकनाथ शिंदे गटात सामील होऊन शिवसेनेशी बंडखोरी केल्याने शिवसेनेच्या नेत्यांच्या चांगलेच जिव्हारी लागले आहे.

बंडखोर आमदार तिथे जाऊन ऐशोआराम करत आहेत. झाडे आहेत, डोंगर आहेत, पाणी आहे, असं सांगत आहेत. येथे लोकांना काही ठिकाणी पाणी नाही. काही ठिकाणी तलाव रिकामे पडले आहे. काही ठिकाणी त्यांच्या त्यांच्या मतदारसंघातला शेतकरी त्रासला आहे, असंही खैरे म्हणाले. बंडखोरांच्या कार्यालयावर आपण का गेला नाहीत? असा सवाल खैरे यांना यावेळी विचारण्यात आला. यावर, आम्ही बंडखोरांच्या कार्यालयावर गेलो पण पोलिसांनी जाण्यास मनाई केली, असं खैरे यांनी सांगितलं. काही हरकत नाही गेलो तर पण दोन-चार दिवसांनी पोलिस राहतील का तिथे? त्यानंतर तयार आहेत सर्व आणि सेना स्टाईलने आम्ही दाखवून देऊ, असा इशाराही खैरे यांनी यावेळी दिला. आज नाही दोन-चार दिवस झोपू द्या त्यांना आणि झोपेतून जागं करू आणि विचारू की ही मुंबई आहे की गुवाहाटी आहे?, असं चंद्रकांत खैरे यांनी बोलून दाखवलं.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button