breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमुंबई

ईडी कार्यालयाबाहेर झळकला ‘भाजप प्रदेश कार्यालय’चा बॅनर

मुंबई – शिवसेना नेते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत (shiv sena leader and mp sanjay raut) यांच्या पत्नी वर्षा राऊत (varsha raut) यांना ईडीने नोटीस (ED notice) पाठवल्याचे काल (दि. २७) वृत्त प्रसिद्ध झाले. यानंतर मुंबईतील तसेच राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलंय. आज (दि. २८) खा. राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन ईडीच्या नोटीसवरून भाजपवर घणाघात केला. भाजपचा पोपट असला तरी मी ईडीचा आदर करतो, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला. (BJP Pradesh Office Banner flashed outside mumbai ED office)

दरम्यान, मुंबईतील ईडीच्या कार्यालयाबाहेर ‘भाजप प्रदेश कार्यालय’ असा फलक लावण्यात आल्याचे समोर आले. हा फलक कोणी लावला याबाबत अधिकृत वृत्त समोर आलेले नाही. 

एचडीआयएलने (HDIL) भाजपला किती देणगी दिली याचा माझ्याकडे हिशोब आहे. भाजपच्या नेत्यांची संपत्ती १६०० पटीने वाढली आहे. याची ईडीने चौकशी केली आहे. भाजपचा पोपट असला तरी मी ईडीचा आदर करतो. राजकीय वैफल्यातून ईडीच्या नोटीशी पाठवल्या जातात. विरोधकांचा प्रत्येक हिशेब माझ्याकडे आहे, असाही हल्लाबोल राऊत यांनी भाजपवर केला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button