breaking-newsआंतरराष्टीय

इराणी कमांडर कासिम सुलेमानींच्या अंत्ययात्रेला लाखोंची गर्दी, चेंगराचेंगरीत 35 जणांचा मृत्यू

तेहरान | महाईन्यूज

अमेरिकेच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेले इराणचे सर्वोच्च लष्करी कमांडर कासिम सुलेमानी यांच्या अंत्ययात्रेला त्यांचे निवासस्थान असलेल्या करमेन शहरात सुरुवात झाली आहे. सुलेमानी यांच्या अंत्ययात्रेला लाखोंच्या संख्येने इराणी नागरिक पोहोचले असून, गर्दीमुळे झालेल्या चेंगराचेंगरीमुळे सुमारे 35 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 48 हून अधिक जण जखमी झालेले आहेत.

शुक्रवारी इराकची राजदानी असलेल्या बगदाद येथे अमेरिकेने केलेल्या ड्रोण हल्ल्यात कासिम सुलेमानींचा मृत्यू झालेला आहे. दरम्यान, सुलेमानी यांना आज सुपूर्द- ए-खाक करण्यात येणार आहे. सुलेमानींचे निवास्थान असलेल्या करमेल येथून त्यांच्या अंत्ययात्रेस सुरुवात झाली आहे. त्यावेळी आपल्या लाडक्या कमांडरला निरोप देण्यासाठी दहा लाखांहून अधिक इराणी नागरिक जमलेले आहेत. यावेळी चेंगराचेंरी झाल्याचेही वृत्त समोर येत आहे. यात 35 जणांचा मृत्यू झाल्याचे एपी या वृत्तसंस्थेने म्हटलेले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button