breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

इराणमध्ये अडकून पडलेल्या ३४ कोल्हापूरकरांना मदत करण्याची सुप्रिया सुळेंची विनंती

कोरोनामुळे इराणमध्ये अडकून पडलेल्या ३४ कोल्हापूरकरांना मदत करण्याची विनंती राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळेंनी परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांच्याकडे केली आहे. कोरोनाचा फैलाव इराणमध्ये वाढत चालला आहे. चीननंतर कोरोनाचे सर्वाधिक बळी इराणमध्ये गेले आहे. आतापर्यंत कोरोनामुळे इराणमध्ये आठवड्याभरात ६६ रुग्ण दगावले आहेत. 

‘कोरोना व्हायरसच्या भीतीने विमान वाहतूक बंद केल्यामुळे कोल्हापूर आणि  परिसरातील ३४ जण इराण येथे अडकले आहेत. त्यामुळे एस जयशंकर यांनी सर्वांना मायदेशी परत आणण्यासाठी प्रयत्न करावेत’ अशी विनंती सुप्रिया सुळेंनी केली आहे. ‘यासर्वांचे  पासपोर्ट आणि तपशील यांची माहिती दिली आहे त्यामुळे या सर्वांना मदत करावी’ अशी विनंती सुप्रिया सुळेंनी आपल्या ट्विटमधून केली आहे. 

गेल्याच आठवड्यात जपान आणि चीनमध्ये कोरोनामुळे अडकलेल्या शेकडो भारतीयांना मायदेशी परत आणण्यात आले होते. कोरोनाची लागण झालेले रुग्ण आढळलेल्या देशांची संख्या ६० पेक्षा जास्त झाली असून, आतापर्यंत या आजारामुळे मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांची संख्या जगभरात ३००० पर्यंत जाऊन पोहोचली आहे. जगभरात सध्या ८८,००० जणांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button